प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली – डॉ. संजय उपाध्ये

Date:

सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही – डॉ. संजय उपाध्ये

विराट हिंदू मेळाव्यात पुरस्कार वितरण

पिंपरी, पुणे (दि. २५ ऑक्टोबर २०२६) अधर्माची वाढ झाल्यानंतर मी जन्म घेतो असे श्रीकृष्णाने सांगितले असले तरी, हिंदूंनी आता सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही, संख्याबळ दाखवणे ही आजची गरज आहे. बुद्धिवादाच्या नादामध्ये साहित्यिक बुद्धिभेद करीत आहेत. अस्तित्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तर विवेक बाजूला ठेवावा लागेल. हिंदूंनो एकत्र आलो नाही, तर युरोपियन राष्ट्राप्रमाणे भारतात परिस्थिती उद्भवू शकते. पुन्हा ‘श्रीकृष्ण’ येणार नाही, तर प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली आहे असे मार्गदर्शन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘धर्मसंस्थापनार्थाय’ या विषयावर व्याख्यान देताना केले.
नवरात्र उत्सव व विजयादशमी निमित्त हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी, (दि.२५) हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्यामध्ये ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते डॉ. अभिजीत सोनवणे यांना ‘स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार २०२६’; ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांना ‘स्व. संजय आर्य स्मृती पत्रकार भूषण पुरस्कार २०१६’ आणि निलंगा येथील श्री राधाकृष्ण फाउंडेशनचे संस्थापक आकाश सोळंके यांना ‘कार्य गौरव पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तम दंडीमे, उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव सुहास पोफळे, समन्वयक कैलास बारणे मिलिंद एकबोटे, मंदार देशपांडे, चंद्रकांत नखाते, योगिता बारणे, सुरेश भोईर, सुरेंद्र करमचंदानी, सविता एकनाथ नाणेकर, सुजाता पोफळे, महेश कुलकर्णी, अर्थ सल्लागार अनुजा घाडगे, अतुल जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले की, या राष्ट्रासाठी ज्या अल्पसंख्याकांनी आपले कर्तृत्व दाखवले त्यांना देशवासीयांनी डोक्यावर घेतले. ७५ वर्षात ५ शिक्षण मंत्री अल्पसंख्यांक होते. अन्य देशातील अल्पसंख्याकांपेक्षा भारतातील अल्पसंख्यांक सुरक्षित आणि विकासाचे जास्त लाभार्थी आहेत. भारता शेजारील देशात हिंदूंची संख्या कमी होत असताना भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे हे चिंताजनक आहे. आतापर्यंतच्या शिक्षणाने हिंदुत्वाची वाट लावली आहे. अकबरच मोठा झाल्याचे शिक्षण ठरवून दिले. आता राजकारण सोडून सर्वांनी देशहित डोळ्यापुढे ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. अन्यथा युरोपातील देशाप्रमाणे आपल्या देशाची परिस्थिती होण्याची भीती डॉ. उपाध्ये यांनी व्यक्त केली.
स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. उत्तम दंडीमे यांनी सांगितले की, गुढीपाडवा, ५ एप्रिल २००० रोजी धर्मवीर आर्य, प्रा. एकनाथ नाणेकर, एस. पी. आर्य, चंद्रकांत जगताप, कुमार पारुल, मी आणि इतर सहकाऱ्यांनी एकत्र येऊन “हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान” या संस्थेची स्थापना केली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून हिंदू धर्म समजून घ्यावा धर्म आणि विज्ञानाची सांगड घालण्यासाठी अंधश्रद्धेतून बाहेर पडावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य घरोघरी पोहोचवून पुढच्या पिढीला आदर्श घालवून द्यावा या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अभिजीत सोनवणे यांनी सांगितले की, मी भिक्षेकर्‍यांची वैद्यकीय सेवा करतो. दुचाकी वर फिरता दवाखाना घेऊन शहर भर फिरतो, त्यांना सेवा देऊन त्यांचे कौशल्य पाहून त्यांना कष्टकरी करण्याचा प्रयत्न करतो. या भिक्षेकर्‍यांची मुलं दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे मला नागरिकांनी ‘भिकाऱ्यांचा डॉक्टर’ ही पदवी दिली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. भक्त मंदिरात देवाकडे मागत असतात, भिक्षेकरी मंदिराच्या बाहेर भक्तांकडे मागत असतात. या भिक्षेकर्‍यांना मी माणूस म्हणून माणसात आणण्याचा प्रयत्न करत आहे. वेद समजला नाही तरी चालेल परंतु नागरिकांनी समाजाची वेदना समजून घ्यावी असे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले.
कुमार जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी, अतुल आचार्य, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, हेमदेव थापर, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले, गोविंद बोळे, श्रीमती अलका आर्य, तेजस्विनी जटाळ, पद्मेश कुलकर्णी, बापू मिरजकर, संजय भाट, रमेश अर्धाले यांनी मेळाव्याच्या आयोजनात सहभाग घेतला.
सूत्रसंचालन राजेंद्र घावटे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : अतुल सावे

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त२ दिवसीय प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ पुणे-शासकीय योजनांची...

अन्यायाला प्रश्न विचारण्यासाठी, उपेक्षितांचे जगणे मांडण्यासाठी आम्ही लिहितो!

स्त्रीवादी साहित्य संमेलनातील विशेष परिसंवादात सात लेखिकांनी उलगडला ‘मी...

‘मोदीच काय, मोदींचा बापही जाईल!’; पाटण्यात मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यावरून वादंग, सभेत एका व्यक्तीला मारहाण

श्रीकृष्ण सिंह जयंती कार्यक्रमात भाषणादरम्यान गोंधळ; ‘माझे म्हणणे चुकीचे...

इंडसइंड सिक्युरिटीजच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजीव आर. श्रीवास्तव यांची नियुक्ती

भांडवली बाजारातील २५ वर्षांचा अनुभव; कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल...