पंतप्रधान मोदींना वेळ मिळेना,हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो धावेना

Date:

पुणेकरांमध्ये संताप-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो च्या उदघाटनासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे या मार्गावर मेट्रो धावत नाही, हा प्रकार संतापजनक आणि निषेधार्ह आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या १०० दिवसांहून अधिक काळ हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर प्रवाशांशिवायच मेट्रो धावते आहे, हा प्रकार पुणेकरांच्या सहनशक्तीचा अंत पहाणारा आणि करूपाने जमा होणाऱ्या पुणेकरांच्या पैशांचा अपव्यय करणारा आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाहतूक कोंडी होते. मेट्रो धावू लागल्यावर सध्या होत असलेली कोंडी थोडीतरी कमी होईल, अशा अपेक्षेत आयटी कर्मचारी, नागरिक तसेच माण, औंध, चतु:श्रृंगी, मॉडेल कॉलनी मार्गावरील भागातील नागरिक रिकामी धावणारी मेट्रो बघत आहेत. पंतप्रधान मोदी यांना या मार्गाचे उदघाटन करून मिरवून घ्यायचे आहे, याकरीता भाजपने या मार्गावरची मेट्रो सेवाच अडवून धरली आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या १७ स्थानकांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची परवानगी तीन महिन्यांपूर्वीच मिळालेली आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी पत्रकात दिलेली आहे.

मूळ आराखड्यानुसार मार्च महिन्यामध्येच हे काम पूर्ण व्हायला हवे होते. आता ‘ट्रायल यन’ या नावाखाली रिकामी मेट्रो धावते आणि लोकं रस्त्यात संतापाने ते दृश्य पहात बसतात, सोशल मीडियावर टीक करून व्यक्त होतात. तरीही गेंड्याची कातडी असलेले भाजप नेते ढिम्म हालत नाहीत. मेट्रो मार्ग बांधणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास महानगर (पीएमआरडीए) चे प्रशासनही भाजपपुढे हतबल झाले आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पुण्यातील दोन मेट्रो मार्गांचे उदघाटन चार-पाच वेळा करून पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला मिरवून घेतले. तसाच प्रकार त्यांना हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो बाबत करायचा असावा. हा मार्ग त्वरीत सुरु व्हावा, म्हणून सर्वजण चातकासारखी वाट बघत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जरूर मिरवून घ्यावे, उदघाटनाचा डामडौल करावा. पण, आधी प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो तातडीने सुरू करावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मोदीच काय, मोदींचा बापही जाईल!’; पाटण्यात मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यावरून वादंग, सभेत एका व्यक्तीला मारहाण

श्रीकृष्ण सिंह जयंती कार्यक्रमात भाषणादरम्यान गोंधळ; ‘माझे म्हणणे चुकीचे...

इंडसइंड सिक्युरिटीजच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राजीव आर. श्रीवास्तव यांची नियुक्ती

भांडवली बाजारातील २५ वर्षांचा अनुभव; कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल...

प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली – डॉ. संजय उपाध्ये

सदगुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही - डॉ. संजय...

शिक्षणाचा उद्देश पैसा कमावणे नसून, माणूस घडवणे असावा-राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

फ्युलचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्नपुणे: शिक्षणाचा उद्देश केवळ चांगली...