आज पुणे घाट परिसराला रेड अलर्ट:महाराष्ट्रात 23 जुलैपर्यंत महिन्याच्या सरासरीपेक्षा 34 टक्के अधिक पाऊस

Date:

महाबळेश्वर ५३ दिवसांमध्ये ३२७५ मिमी पाऊस

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पावसाची हजेरी गुरुवारीही कायम राहिली. अनेक भागांत संततधार सुरू होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल.जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये मात्र मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. २३ जुलैपर्यंत राज्यात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा ३४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून राज्याने मासिक सरासरी ओलांडली आहे. अर्थात ही पावसाची टक्केवारी पुणे, मुंबई, कोकणातील पावसामुळेच वाढली आहे. मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची गरज आहे.

नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने डहाणू रोड ते गुजरातेतील वलसाड दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारी पुणे घाट परिसराला रेड, नाशिकला ऑरेंज, नंदुरबार, अकोल्याला यलो अलर्ट दिला आहे.
गुजरातच्या वलसाडमध्ये खासगी बसने गेलेले महाराष्ट्रातील ३५ पर्यटक पुरात अडकले होते. गुजरात प्रशासनाने हेलिकॉप्टर पाठवून त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या ३५ पर्यटकांपैकी १७ जण जालना तर उर्वरित संभाजीनगर व परभणी जिल्ह्यातील आहेत.

देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजीमध्ये पडतो. यंदाही १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळ्यात गेल्या ५३ दिवसांत म्हणजे २३ जुलैपर्यंत चेरापुंजी (मेघालय) येथे ३६११.४ मिमी पाऊस झाला आहे. त्याखालोखाल महाबळेश्वरमध्ये याच कालावधीत ३२७५ मिमी पाऊस झाला आहे.देशातील सर्वाधिक पावसांच्या ५ शहरांत मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. येथे १५०१.६ मिमी पाऊस झाला आहे.

आशियावर १०,००० किमी लांबीचे ढग पसरले

नवी दिल्ली । भारतावर मान्सून मेहेरबान झाल्याने २ दिवसांत सरासरीपेक्षा १७०-१८०% जास्त पाऊस झाला. पश्चिम भारत ते दक्षिण कोरियापर्यंत सुमारे १० हजार किलोमीटरपर्यंत पावसाचे ढग पसरले आहेत. त्यांचे छायाचित्र उपग्रहाने टिपले आहे. तज्ज्ञांनी त्याला क्लाऊड कॉरिडॉर असे नाव दिले आहे.

हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, भारतावर ज्या भागात हा ढग दाटला आहे, तेथे पाऊस होत आहे.
त्र्यंबकेश्वरला गेल्या २४ तासांत २९९ आणि नाशिकला १३० मिमी पाऊस झाला. त्यामुळे गंगापूर धरण एकाच दिवसात ७९ वरून ९७ टक्के भरल्याने विसर्ग वाढवण्यात आला. आता जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता आहे. नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरीतील प्रवाहातही वाढ झाली. यंदा प्रथमच दुतोंड्या मारुती डोक्यापर्यंत म्हणजे ९०% बुडाला आहे.वलसाडला एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये औरंगा नदीचे पाणी शिरल्याने कार बुडाल्या.
वलसाडच्या उमरगाव तालुक्यात अवघ्या ४५ तासांत १२७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. वलसाड, सुरत आणि नवसारी (येथे कावेरी नदीला पूर आला) येथून आतापर्यंत १,२०० हून अधिक लोकांना वाचवले असून २२ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्या शिवाय माघार नाही :दीपके

सोनम सर यांचा २६ दिवसांचा त्याग आम्ही वाया जाऊ...

पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई-पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क मिळणार नाही,...

गंगा, यमुनासह 10 नद्यांना पूर:गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका

नवी दिल्ली- देशात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. दक्षिण...