मुख्यमंत्र्यांनी पुण्यात घेतला ढोल वाजविण्याचा आनंद

Date:

श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्टच्या गणपती परिसरात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पारंपरिक ढोल-ताशा गजरात पथकाने स्वागत केले. यावेळी त्यांनी ढोल वाजविणाऱ्या युवकाकडून टिपरू काठी घेत स्वतः ढोल वाजविण्याचा आनंद घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी

पुणे, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच आरती केली. यावेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मानाचा कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ तसेच श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्ट येथील श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच महापौर मंजुषा नागपुरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार नितीन नबीन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, योगेश टिळेकर, हेमंत रासणे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासणे, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेत ‘मंत्रा’च्या नावाच्या भेटवस्तूंचे वाटप- सामाजिक कार्यकर्ते संजय कोणे यांनी केला भांडाफोड

पुण्यात टेकड्यांची तोडफोड, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि उंच...

‘उद्या दुपारी मुंबईकडे निघणार; आझाद मैदानात जाण्यापासून कोण रोखतं ते बघतो’ — मनोज जरांगे

प्रकृती खालावल्याने सलाईन सुरू; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला,...