अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळा२३ जानेवारी २०२७ पर्यंत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रशिक्षणाची सुविधा

Date:

पुणे, दि. 4 : महाराष्ट्र राज्यात अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांसाठी ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत २ ऑक्टोबर २०२६ ते २३ जानेवारी २०२७ या कालावधीत मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणामध्ये अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक चालकांना चार सत्रांमध्ये मराठी भाषेचे प्राथमिक व्यवहारिक ज्ञान दिले जाणार आहे. प्रशिक्षणाची वेळ दररोज दुपारी ३ ते ४ अशी आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांच्या मराठी भाषेच्या जुजबी व्यवहारिक ज्ञानाची तपासणी करून अधिकृत प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक चालकांसाठी हे प्रमाणपत्र परिवहन विभागाने अनिवार्य केले आहे. प्रमाणपत्र देण्याचे अधिकार केवळ कोकण मराठी साहित्य परिषद व मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांना देण्यात आले असून, या संस्थांनी जारी केलेले प्रमाणपत्रच वैध राहणार आहे.

प्रशिक्षणासाठी येताना चालकांनी आधारकार्ड, रिक्षा अथवा टॅक्सी चालक परवाना, वाहन परवाना आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावीत.

तरी सर्व अमराठी ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक चालकांनी २३ जानेवारी २०२७ पर्यंत दररोज दुपारी ३ ते ४ या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रिजजवळ, पुणे येथील सहकार सभागृह (पहिला मजला) येथे उपस्थित राहून मराठी भाषेचे प्राथमिक व्यवहारिक ज्ञान प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत – सुनेत्राताई पवार

पानमंदवाडीतील ५ मेगावॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण; २५०४ शेतकऱ्यांना दिवसा...

काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे की केवळ घोषणांपुरताच आदर? : डॉ. नीलम गोऱ्हे

लोकशाही बचाव आंदोलनात महिला खासदाराला चापट मारल्याच्या कथित प्रकारावरून...