वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तत्पर राहा मुख्य अभियंता रामराव मुंडे यांचे निर्देश

Date:

 

पुणे : संततधार व मुसळधार पावसामुळे खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांनी तत्पर राहावे, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिले आहे.

गुरुवारी (दि. 07) मुख्य अभियंता श्री. मुंडे यांनी पुणे परिमंडलातील विविध कार्यालयांत जाऊन वीजपुरवठ्याबाबत आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. सुनील पावडे, श्री. महेंद्ग दिवाकर यांच्यासह कार्यकारी अभियंता व अधिकारी उपस्थित होते.

मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या साहित्याची कमतरता नाही व ते मागणीनुसार ते पुरविण्यात येईल. तसेच आवश्यक साहित्य खरेदीचे अधिकार उपविभाग, विभाग व मंडल कार्यालयास असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी जुन्या फिडर पिलरमधील वाहिन्यांमध्ये आर्द्गतेमुळे बिघाड होत आहे किंवा होण्याचा धोका आहे त्या ठिकाणी इन्सूलेशन स्प्रे मारण्याची सूचना केली. पावसाचे पाणी साचणार्‍या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात अनावश्यक किंवा हेतूपुरस्सर विलंब झाल्याचे दिसून आल्यास जबाबदार संबंधीतांवर कारवाई करण्याची सूचना अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना करण्यात आली आहे.

दरम्यान, वीज वितरण यंत्रणेची तांत्रिक दुरुस्ती व देखभाल तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी सर्व साहित्यांचा महावितरणकडून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांवर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही आर्थिक जबाबदारी नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात अनेक ठिकाणी विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात भूमिगत वाहिन्यांना क्षती पोहोचल्याचे पावसाळ्यात दिसून येत आहे. या खोदकामामुळे पावसाचे पाणी झिरपल्याने उच्च व लघुदाब वाहिन्यांमध्ये आर्द्गता (माईश्चर) निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. याशिवाय रस्त्यांची उंची वाढल्याने कडेच्या फिडर पिलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरल्याने वाहिन्यांत आर्द्गता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले आहे. मुख्य वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरळीत असला तरी रोहित्र किंवा फिडर पिलरच्या भूमिगत लघुदाब वाहिन्यांमध्ये साचलेल्या पाण्याने आर्द्गता निर्माण झाल्याने मुख्यत्वे उत्तमनगर, बाणेर, बालेवाडी, आनंदनगर आदी भागांतील काही सोसायट्यांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता.

साधारणतः मान्सूनपूर्व पावसात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आढळून आल्यानंतर यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्यात येते. परंतु यंदाच्या पहिल्या पावसाने गेल्या पाच दिवसांपासून संततधार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी दुरुस्ती कामांत व्यत्यय आले होते. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, फांद्या वीजयंत्रणेवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. खोलगट व सखल भागात असलेल्या फिडर पिलर, रिंगमेन युनिट आदी यंत्रणेत पाणी शिरल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमध्ये दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्गता काढणे, जाईंट करणे आदी कामे अविश्रांत करून महावितरणच्या अभियंता व कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा सुरळीत केला आहे.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 तसेच 1912 या तीन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येणार आहे. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....