पुण्यात अतिक्रमणांवर महापालिकेचा पुन्हा दणका; एकाच दिवसात २ लाख २० हजार ५३० चौरस फुटांवर कारवाई!

Date:

खराडी, केशवनगर, धायरी, नऱ्हे, बावधन, कोरेगाव पार्क, बिबवेवाडी, धनकवडी आणि कात्रज परिसरात धडक मोहीम; कर्मचारी उपलब्ध नसल्याने झोन क्रमांक ६ मध्ये कारवाई नाही

पुणे : पुणे महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम कायम ठेवली असून, शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील पाच झोनमध्ये एकूण २ लाख २० हजार ५३० चौरस फूट क्षेत्रावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कारवाई झोन क्रमांक १ मध्ये करण्यात आली असून, त्या खालोखाल झोन क्रमांक २ आणि ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

झोननिहाय कारवाईचा तपशील

झोन क्रमांक १ – ६९,९५० चौरस फूट

  • पूर्व खराडी, बायपास रस्ता, गावठाण रस्ता आणि झेनस्टार आयटी पार्क रस्ता – ४१,१५० चौरस फूट.
  • केशवनगर-मांजरी रस्ता, रेणुका माता मंदिर चौक – २८,८०० चौरस फूट.

झोन क्रमांक २ – ५१,५०० चौरस फूट

  • जुनी व नवीन धायरी, उंबऱ्या गणपती चौक ते परी चौक – २७,२०० चौरस फूट.
  • नऱ्हे, कंट्रोल चौक ते नवले रुग्णालयाच्या मागील बाजूचा परिसर – २४,३०० चौरस फूट.

झोन क्रमांक ३ – ३३,७८० चौरस फूट

  • बावधन खुर्द, चांदणी चौक ते भुगाव रस्ता परिसर.

झोन क्रमांक ४ – १७,८०० चौरस फूट

  • कोरेगाव पार्कमधील गल्ली क्रमांक ५, ६ आणि ७ तसेच वाकडेवाडी परिसर.

झोन क्रमांक ५ – ४७,५०० चौरस फूट

  • बिबवेवाडी, अप्पर आणि बिबवेवाडी रस्ता – १२,५०० चौरस फूट.
  • धनकवडी आणि कात्रज परिसर – ३५,००० चौरस फूट.

झोन क्रमांक ६ – निरंक

या झोनमध्ये डीपी रस्त्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, कर्मचारी उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई होऊ शकली नाही.

एकाच दिवसातील कारवाईचा एकूण तपशील

| झोन | कारवाईचे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात बिसलेरीच्या बाटलीसारखे सहज मिळतात ड्रग्ज; माणसे मारली जात असताना सरकार अतिक्रमणाच्या चर्चेत व्यस्त : सतेज पाटील

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही गंभीर सवाल; डिलिमिटेशनचे ‘गाजर’ स्वीकारणे म्हणजे...

पुण्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही; भिडेवाडा स्मारकाबाबतही सरकारची अनास्था : सतेज पाटील

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसकडून अभिवादन; भाजप सरकारवर...