भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले पुण्यातील गणपतींचे दर्शन

Date:

पुण्यातील गणेशोत्सवात केली देशातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना

पुणे-भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाला भेट देऊन श्रींची आरती केली.तसेच कसबा गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला भेट देऊन विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी श्री. नबीन यांनी संपूर्ण देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महापौर मंजुषा नागपुरे, आ. हेमंत रासने, पुणे महानगर अध्यक्ष धीरज घाटे आदी नेते उपस्थित होते.
सायंकाळी पुणे विमानतळावर नितीन नबीन यांचे आगमन होण्याआधी शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. पुण्यात आगमन झाल्यावर श्री. नितीन नबीन यांनी सर्वप्रथम कसबा पेठेतील मानाच्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला भेट देत गणरायाची पूजा करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी सदाशिव पेठेतील साने गुरुजी तरुण मित्र मंडळ आणि कोथरूड येथील श्री साई मित्र मंडळाच्या गणरायांचे दर्शन घेत पूजा केली. यावेळी नितीन नबीन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशमूर्तींच्या पुनर्विसर्जनासाठी खाण भाड्याने; २५ दिवसांसाठी ₹१२.५० लाखांचा खर्च

सुरुवातीचा ₹१५ लाखांचा दर चर्चेनंतर कमी; गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी...

एचसीएमटीआरच्या भूसंपादनासाठी ₹२,६३४ कोटींच्या खर्चाला मान्यता

४.९८ लाख चौ.मी. जमीन संपादित करणार; १५ भागांतील जागांचा...

महापौरांसह महापालिकेचे दोन अधिकारी जपान दौऱ्यावर जाणार

२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दौरा; पुणे-ओकायामा मैत्री व...