पीएम सूर्य घर आणि ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार विशेष ‘किओस्क’

Date:

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा सेतू कॅम्प’; ऑनलाइन अर्जासोबत बँक कर्जासाठीही एकाच ठिकाणी सुविधा

मुंबई : केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या पुढाकारातून राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा सेतू कॅम्प’ आयोजित करण्यात येणार आहेत. या मोहिमेअंतर्गत ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरण तालुका पातळीवर विशेष ‘किओस्क’ उभारणार आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यातील सर्व तालुका पातळीवर हे किओस्क उभारण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्रांमध्ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, अर्ज आणि उपलब्ध योजनांबाबत ग्राहकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जाणार आहे.

किओस्कमध्ये महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना रूफटॉप सोलरसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. तसेच विविध बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार असल्याने सौर प्रकल्पासाठी आवश्यक बँक कर्जाचा अर्जही त्याच ठिकाणी करता येणार आहे.

‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ अंतर्गत निवासी ग्राहकांसाठी रूफटॉप सोलर प्रकल्पांना केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्याची तरतूद असून अर्ज आणि अनुदान प्रक्रियेसाठी राष्ट्रीय रूफटॉप सोलर पोर्टलची व्यवस्था उपलब्ध आहे.

महावितरणच्या या विशेष मोहिमेमुळे नागरिकांना योजनेची माहिती, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि वित्तपुरवठ्यासाठी मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे रूफटॉप सोलर बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी प्रक्रिया अधिक सोपी होण्याची अपेक्षा आहे.

महावितरण प्रशासनाने नागरिकांना १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित होणाऱ्या ‘सेवा सेतू कॅम्प’ आणि तालुकास्तरीय किओस्कचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींचा वाढदिवस ‘काळा दिवस’; ‘२५ वर्षांत काय दिवे लावले?’ — हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी संकट आणि मराठा आरक्षणावर केंद्र-राज्य सरकारवर...

बाणेर मशिदीच्या जमिनीची २००६ मधील विक्री परवानगी वक्फ मंडळाकडून रद्द; अॅड. समीर शेख यांचा दावा

बिल्डरच्या ताब्यात गेलेली वक्फ जमीन वाचल्याचा दावा; व्यवहारातील कथित...

दिल्ली-कर्नाल ९० मिनिटांत, दिल्ली-बावल अवघ्या ६७ मिनिटांत; दोन नव्या ‘नमो भारत’ मार्गांना लवकरच मंजुरीची शक्यता

दिल्ली-पानिपत-कर्नाल आणि दिल्ली-गुरुग्राम-बावल कॉरिडॉरच्या तयारीला वेग; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची...

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी आता सप्टेंबरअखेरची नवी डेडलाईन

पहिल्या टप्प्यात १२ ऐवजी १७ स्थानके सुरू करण्याची PMRDAची...