शिवनेरीच्या बफर झोनमधील अनधिकृत बांधकामांवर सात दिवसांत कार्यवाही करा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

Date:

‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांच्या कालावधीची तपासणी करण्याचे निर्देश

मुंबई, दि. ८ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे ऐतिहासिक व जागतिक वारसा मूल्य लक्षात घेता किल्ला परिसरातील अनधिकृत बांधकामे, कबर व दर्ग्यांसह अन्य संरचनांबाबत तातडीने वस्तुनिष्ठ तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले.

शिवनेरी किल्ला व त्याच्या परिसरातील स्थितीबाबत आज मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (ASI) अधिकारी, पुरातत्त्व विभाग, तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची आढावा बैठक झाली.

शिवनेरी किल्ला हा जागतिक वारसा वारशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, संबंधित वारसा वास्तूच्या संरक्षित व बफर झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम अथवा संरचना उभारली जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मंत्री ॲड. शेलार यांनी दिल्या.

किल्ला परिसरातील कबर, दर्गा तसेच इतर संरचना नेमक्या कोणत्या कालखंडात निर्माण झाल्या, त्याबाबत महसूल अभिलेख, उपलब्ध ऐतिहासिक दस्तऐवज तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या संरचना पूर्वीपासून अस्तित्वात होत्या की अलीकडच्या काळात निर्माण करण्यात आल्या, याची निश्चित पडताळणी करण्याच्या सूचना मंत्री शेलार यांनी दिल्या.

‘नेत्रम’ ॲपच्या माध्यमातून संरचनांची तपासणी

या तपासणीसाठी केंद्र सरकारच्या ‘नेत्रम’ ॲपचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. उपग्रह छायाचित्रांच्या आधारे एखादी संरचना कोणत्या कालावधीपासून अस्तित्वात आहे, याबाबत माहिती मिळविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या ‘महास्टॅट’ यंत्रणेशी समन्वय साधून उपलब्ध तांत्रिक माहितीचा वापर करून संरचनांची कालानुक्रमिक पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवनेरी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित संरचना जागतिक वारसा स्थळाच्या बफर झोनच्या नियमांचे उल्लंघन करतात का, याबाबत अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण परिसराला भेट देऊन पाहणी करुन यातील काही गंभीर बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली होती. आज या बैठकीत उपस्थित राहून त्यांनी सदर बाबी त्यांनी बैठकीत मांडल्या.

सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

शिवनेरीच्या वारसा संवर्धनाशी संबंधित बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. अनधिकृत असल्याचे निष्पन्न झालेल्या संरचनांबाबत नियमानुसार नोटीस बजावून, त्यावर सात दिवसांच्या आत पुनरावलोकन करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडित असलेला अत्यंत महत्त्वाचा वारसा असून, त्याचे पुरातत्त्वीय आणि जागतिक वारसा मूल्य अबाधित ठेवणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मंत्री शेलार यांनी दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही : देवेंद्र भुजबळ

मुंबई : भाषा ही माणसांना जोडण्याचे माध्यम आहे. त्यामुळे...

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

पुणे : भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षण आणि गुरू हा पाया होता, तोपर्यंत समाज...

वुशू खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचे आवश्यक सहकार्य मिळवून देणार – मुरलीधर मोहोळ

आळंदीत राज्यस्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन; आंतरराष्ट्रीय पंच...