पुण्यात ‘व्हिझ-किड’ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत २५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

Date:

पुणे : किंग्ज इंडियन चेस क्लब (KICC) आणि बाकलीवाल ट्युटोरियल्स (BT) यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे जिल्हा बुद्धिबळ मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘व्हिझ-किड वन-डे रॅपिड चेस टूर्नामेंट’मध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील २५० हून अधिक बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला. रविवारी (दि. ३०) वाकड येथील युरो स्कूलमध्ये ही स्पर्धा झाली.

स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी ६० हजार रुपयांचे एकूण पारितोषिक ठेवण्यात आले होते. ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, ३५ वर्षांवरील तसेच मुलींसाठी विशेष अशा पाच गटांत स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना चषक, पदके आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

११ वर्षांखालील खुल्या गटात आयुष जगतापने प्रथम, तीर्थ कोद्रा याने द्वितीय, तर विश्वजा देशमुखने तृतीय क्रमांक मिळविला. १३ वर्षांखालील गटात एएफएम कविश लिमये प्रथम, विभव गुप्ता द्वितीय आणि विहान शाह तृतीय ठरले. १५ वर्षांखालील गटात चंद्रमौली जयकृष्णनने विजेतेपद पटकावले. डब्ल्यूसीएम अन्वी हिंगे द्वितीय तर प्रथमेश सुतार तृतीय आला.

३५ वर्षांवरील खुल्या गटात एफएम गौरव बाकलीवालने प्रथम क्रमांक मिळविला. आयएम विक्रमादित्य कुलकर्णी द्वितीय आणि राहुल वर्मा तृतीय ठरले. मुली व महिलांच्या विशेष गटात ११ वर्षांखाली शाल्वी चस्कर, १३ वर्षांखाली अन्वी शेळके, १५ वर्षांखाली समायरा राय आणि ३५ वर्षांवरील गटात आशा ठोंबरे यांनी विजेतेपद मिळविले.

स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये राजस्थान राज्याचे माजी बुद्धिबळ विजेते तसेच जेईई १९९४ मध्ये अखिल भारतीय २२८२ वा क्रमांक मिळविलेले गौरव बाकलीवाल यांचा समावेश होता.  बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक व संचालक वैभव बाकलीवाल यांनी विजेत्यांचा गौरव केला. त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांसोबत कोडी व बुद्धिबळाशी संबंधित प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून संवाद साधला. दोन्ही बाकलीवाल बंधू फिडे मानांकित बुद्धिबळपटू असून, बुद्धिबळामुळे विकसित होणारी एकाग्रता, संयम, दूरदृष्टी आणि दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतही उपयुक्त ठरते, असा आयोजकांचा विश्वास आहे.

स्पर्धा संचालक व  बाकलीवाल ट्युटोरियल्सचे संस्थापक वैभव बाकलीवाल म्हणाले, “या स्पर्धेच्या माध्यमातून युवा बुद्धिमत्तेला एकत्र आणता आल्याचा आनंद आहे. बुद्धिबळामुळे एकाग्रता वाढते आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होते. सर्व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन आणि विजेत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.”

या स्पर्धेमुळे पुण्यातील विद्यार्थी व युवा बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. तसेच शिस्त, रणनीती, खिलाडूवृत्ती आणि निरोगी स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावा

अर्धनग्न अवस्थेमध्ये जर का महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करत...

पुण्यातील वाहतूक कोंडीत आता मांडवांची,कमानींची भर..उत्सव लोकांसाठी आणि रस्ताही लोकांसाठीच ….

आधीच कोंडीत अडकलेल्या पुणेकरांसाठी आणखी एक प्रश्न पुणे : उत्सव...

होर्मुझमध्ये पुन्हा संघर्ष पेटला; अमेरिकेने इराणचे 2 रॉकेट लाँचर्स केले नष्ट

महिनाभरानंतर इराणवर अमेरिकेचा हल्ला; सैनिकांसह नागरिक ठार झाल्याचा इराणचा...

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...