डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावा

Date:

अर्धनग्न अवस्थेमध्ये जर का महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करत असतील, तर हे श्रीकृष्णाला तरी आवडणार आहे का? गणपतीला तरी आवडणार आहे का? खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णींचा परखड सवाल

गणेशोत्सवाच्या काळात गुटख्याच्या किंवा आरोग्यास घातक असणाऱ्या उत्पादनांच्या सरोगेट (छुप्या) जाहिराती स्वीकारु नयेत

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी पुण्याची ओळख असून, पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्याने महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ‘पुणे पॅटर्न’ तयार करावा. कोणत्याही जाती-धर्माचा सण, उत्सव असला, तरी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. डीजे, प्लाझ्मा, लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी आणावी,” असे परखड मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अर्धनग्न अवस्थेमध्ये जर का महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करत असतील, तर हे श्रीकृष्णला तरी आवडणार आहे का? गणपतीला तरी आवडणार आहे का? याचा विचार मंडळांनी, कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी करायला हवा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “गेल्या अनेक वर्षांपासून डीजे, गोंगाट आणि उत्सवाला गालबोट लावणाऱ्या गोष्टींविरोधात भूमिका मांडत आले आहे. त्यामुळे केवळ गणेशोत्सवच नाही, तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही डीजेचा दणदणाट बंद व्हावा, असे मला वाटते. सण-उत्सवांच्या काळात वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजेमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, उच्च रक्तदाब व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तीव्र त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे उत्सव साजरा करत असताना या सगळ्याचा अवश्य विचार व्हायला हवा. गोंगाटामुळे उत्सवाच्या काळात नागरिकांना शहरातून स्थलांतरित होण्याची वेळ येऊ देऊ नये. न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. गणेशोत्सवाच्या काळात गुटख्याच्या किंवा आरोग्यास घातक असणाऱ्या उत्पादनांच्या सरोगेट (छुप्या) जाहिराती स्वीकारु नयेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “लोकमान्य टिळक यांनी समाजप्रबोधनाच्या उद्देशाने गणेशोत्सव सार्वजनिक केला. यामध्ये व्याख्याने, वैचारिक देवाणघेवाण, मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या समाजासाठी उपयुक्त गोष्टी व्हायला हव्यात. पुण्यातील बरीच मंडळे अशाप्रकारे प्रबोधनपूर्ण उत्सव साजरा करतात. अशा मंडळांचा आदर्श सर्वानी घ्यावा. पुण्यातील सुमारे २०० गणेश मंडळांनी यंदा डीजे न वापरता विधायक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे अनुकरण इतर मंडळांनीही करावे आणि हा उत्सव समाजातील सगळ्यांनाच सुसह्य कसा होईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे.”

अश्लील गाणी, धर्माला न शोभणारे वर्तन अशाप्रकारे उत्सव साजरे करु नयेत. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करताना सभ्यता राखावी आणि सर्वसामान्य पुणेकरांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपल्या देशात ध्वनीप्रदूषणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते, इतर देशांत मात्र पर्यावरण जपण्यासाठी कडक नियम आहेत. आपल्या देशात मात्र पर्यावरणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसते. मात्र पर्यावरण, प्रदूषण याबाबत वैयक्तिक स्तरावर आणि सार्वजनिक स्तरावरही प्रत्येकाने योग्य पद्धतीने विचार आणि कृती करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

काही जागरूक नागरिकांनी मांडलेली भूमिका समाजाच्या हिताची आहे. त्यामुळे ते आस्तिक आहेत की नास्तिक आहेत, याच्याशी संबंध जोडता कामा नये. गणेश मंडळांनी पुणेकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. लोकप्रतिनिधींनी उत्सवांचे स्वरूप, नागरिकांना होणारा त्रास समजून घेत सुज्ञपणे भूमिका मांडायला हव्यात. प्रशासनानेही योग्य त्या गोष्टींची अंमलबजावणी करावी.

– प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यसभा खासदार 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात ‘व्हिझ-किड’ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत २५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग

पुणे : किंग्ज इंडियन चेस क्लब (KICC) आणि बाकलीवाल...

पुण्यातील वाहतूक कोंडीत आता मांडवांची,कमानींची भर..उत्सव लोकांसाठी आणि रस्ताही लोकांसाठीच ….

आधीच कोंडीत अडकलेल्या पुणेकरांसाठी आणखी एक प्रश्न पुणे : उत्सव...

होर्मुझमध्ये पुन्हा संघर्ष पेटला; अमेरिकेने इराणचे 2 रॉकेट लाँचर्स केले नष्ट

महिनाभरानंतर इराणवर अमेरिकेचा हल्ला; सैनिकांसह नागरिक ठार झाल्याचा इराणचा...

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...