कौटुंबिक छळाकडे डोळेझाक करणाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करा

Date:

हुंडाबळी कायद्यातील सात वर्षांच्या मर्यादेचा पुनर्विचार आवश्यक

पिंपरी-चिंचवड, दि. : वाकड येथील शिल्पा सचिन गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाचा कोणत्याही राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक दबावाला बळी न पडता मुळापर्यंत जाऊन निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्या तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

डॉ. गोऱ्हे यांनी वाकड पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली. यावेळी सांगली महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे, लातूर संपर्क रंजना कुलकर्णी उपस्थित होते. माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागण्यासाठी शिल्पा यांचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व आरोपांची पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

घटनेपूर्वीच्या पाच दिवसांतील घटनाक्रम, माहेरी व सासरी झालेले संवाद, कॉल रेकॉर्ड, संदेश, सीसीटीव्ही फुटेज तसेच वैद्यकीय आणि तांत्रिक पुरावे तपासावेत. नातेवाईक, मैत्रिणी व परिचितांनी त्यांच्याकडील माहिती पोलिसांना द्यावी. संबंधित व्यक्तींची पदे, प्रतिष्ठा किंवा राजकीय लागेबांधे तपासाआड येऊ नयेत, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

कौटुंबिक छळाची माहिती असूनही त्याकडे डोळेझाक करणे अयोग्य आहे. छळाला प्रोत्साहन, साथ किंवा संरक्षण दिल्याचे आढळल्यास संबंधितांचीही जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या शिवसेनेच्या ‘लाडकी सून, सुरक्षित सून’ अभियानाचा उद्देश कौटुंबिक छळ सहन करणाऱ्या महिलांच्या पाठीशी उभे राहणे हा आहे. “प्रत्येक घरातील सून ही लाडकी असली पाहिजे, ही भूमिका प्रत्यक्ष कृतीत उतरवून पीडित महिलांपर्यंत तातडीने मदत पोहोचवली पाहिजे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांना पोलीस, भरोसा सेल आणि संरक्षण अधिकाऱ्यांसोबतच स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून समुपदेशन, कायदेशीर सल्ला व आवश्यक सहाय्य उपलब्ध आहे. छळ सहन करणाऱ्या महिलांनी शांत न राहता या यंत्रणांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

“विवाहाला सात वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यानंतरही महिलेचा छळ सुरू राहू शकतो. त्यामुळे हुंडाबळीच्या तरतुदीतील सात वर्षांच्या मर्यादेचा पुनर्विचार करून दीर्घकाळच्या छळामुळे मृत्यू झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करता येईल, असा कायदेबदल आवश्यक आहे,” अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.

या प्रकरणाचा तपास आणि आवश्यक कायदेबदलाबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राखीच्या धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना

ना. चंद्रकांतदादा पाटील यांना वस्ती भागातील असंख्य मातांनी बांधली...

दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी : ना. चंद्रकांतदादा पाटील

चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाने प्रभावित : कृष्णकुमार बूब मानसी प्रेरणा...

३१ ऑगस्टपर्यंत भूसंपादनाची प्रकरणे सादर करा; १० सप्टेंबरपर्यंत मोजणी सुरू करण्याच्या सूचना

भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे...