राखीच्या धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना

Date:

ना. चंद्रकांतदादा पाटील यांना वस्ती भागातील असंख्य मातांनी बांधली राखी

दातृत्वाची प्रेरणा घेऊन इतरांना मदतीचा हात द्यावा!- ना. पाटील

सखी-सुखदा वुमन वेल्फअर फाऊंडेशनच्या माध्यमातून बालवाडी कार्यान्वित करण्याची ओवाळणी

पुणे : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नाही, तर नात्यांमधील जिव्हाळा, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाउंडेशनच्या भगिनींसोबत ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी अनेक मातांनी दादांच्या मनगटावर राखी बांधत आपल्या आयुष्यातील एका अनमोल क्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाउंडेशनतर्फे कोथरूड परिसरातील वस्ती भागातील असंख्य महिलांचे बाळंतपण अतिशय सुरक्षितपणे केले जाते. आर्थिक परिस्थितीमुळे प्रसूतीच्या काळात निर्माण होणारी चिंता, उपचारांचा खर्च आणि सुरक्षित बाळंतपणाची काळजी यामुळे अनेक कुटुंबांसमोर मोठे आव्हान उभे राहते. मात्र, दादांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या उपक्रमामुळे अनेक गरजू मातांना आधार मिळाला आणि त्यांची प्रसूती सुरक्षितपणे पार पडली.

या उपक्रमाचा लाभ घेतलेल्या मातांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने चंद्रकांतदादा पाटील यांना राखी बांधली, तेव्हा वातावरण भावूक झाले. ज्या हातांनी त्यांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी आधार दिला, त्याच हातावर या मातांनी प्रेम आणि कृतज्ञतेचा धागा बांधला. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यांतील कृतज्ञतेची भावना हीच या उपक्रमाच्या यशाची खरी पावती ठरली.

“दादा, आमच्या बाळाला सुरक्षितपणे या जगात आणण्यासाठी तुम्ही दिलेला आधार आम्ही कधीच विसरणार नाही,” या भावनेतून मातांनी राखी बांधताना व्यक्त केलेली कृतज्ञता उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.

यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “आज आपल्या बहिणी सक्षम आणि समर्थ झाल्या आहेत. मात्र रक्षाबंधनाचा सण आणि त्यामागची भावना कायमस्वरूपी जपली जाईल. ‘सखी-सुखदा’च्या माध्यमातून सुरक्षित प्रसूतीसाठी मदत करण्यासोबतच गरोदर महिलांसाठी आपल्या संस्कृतीतील संस्कार जपता आले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे!” या विचारातून दातृत्वाची प्रेरणा घेऊन आपणही इतरांना मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रत्येक मातेने आपले आणि बाळाचे आरोग्य जपावे, असे आवाहन ही त्यांनी यानिमित्ताने केले.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून बालवाडी सुरु करण्याची ओवाळणी सर्व मातांना दिली. तसेच, फाऊंडेशनच्या माध्यमातून १६ महिन्यांच्या बाळाची श्रवणक्षमता शक्य तितकी उत्तम होण्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी करण्याचाही घोषणा ही त्यांनी या कार्यक्रमात केली.

या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका स्मीता पाटील, ॲड. तनिषा पाटील, सुरेखा जगताप, आकांक्षा कर्णावत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्यासह कोथरुड मधील वस्ती भागातील असंख्य माता उपस्थित होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी : ना. चंद्रकांतदादा पाटील

चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाने प्रभावित : कृष्णकुमार बूब मानसी प्रेरणा...

३१ ऑगस्टपर्यंत भूसंपादनाची प्रकरणे सादर करा; १० सप्टेंबरपर्यंत मोजणी सुरू करण्याच्या सूचना

भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे...

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य जुलै २०२६...