SIR चे काम अत्यंत घाईगडबडीत, भाजपाकडून आता मतदार याद्यात चोरी करण्याचा प्रयत्न; नागपूरच्या हैदराबाद हाऊसमध्ये BLO ना कशासाठी बोलावले? हर्षवर्धन सपकाळ.

Date:

मुंबई/नाशिक, दि. २४ ऑगस्ट २६

संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांच्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आज नाशिक येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्राच्या सहप्रभारी रेहाना चिश्ती, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, प्रशिक्षण विभागाचे महाराष्ट्राचे प्रमुख आशुतोष शिर्के आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, राजाराम पानगव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम, प्रभावी आणि जनतेशी थेट जोडणारे करण्याच्या उद्देशाने या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना काँग्रेसची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकास, जनसंपर्क, निवडणूक व्यवस्थापन तसेच आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांशी अधिक प्रभावी संवाद निर्माण करून पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर या प्रशिक्षण शिबिरात विशेष भर देण्यात येणार आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसप्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संघटन सृजन अभियानाअंतर्गत निवड करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांसाठी हे १० दिवसांचे शिबिर आहे. या दहा दिवसात काँग्रेसचे वरिष्ठ नेते,विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाच्या ९ व्या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल मार्गदर्शन करणार आहेत. तर समारोपासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी येणार आहेत. अशा प्रकारचे शिबिरे काँग्रेस पक्षात सातत्याने होत असतात.या शिबिरात विचारमंथन, कार्यानुभवही असणार आहे. राहुल गांधी जी भूमिका मांडत आहेत ती भूमिका जिल्हाध्यक्ष पुढे घेऊन जातील. नाशिकमध्ये हा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे.

महिला विधेयकावर भाजपाकडून बुद्धीभेद.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. या कार्यक्रमात राहुल गांधी हे सर्व जाती धर्माच्या महिलांबद्दल बोलले, त्यांच्या व्यथा मांडल्या पण भाजपा मात्र त्याला धार्मिक रंग देत आहे. महिला विधेयकाबद्दल भाजपाच बुद्धीभेद करत आहे. २०२३ रोजीच महिला विधेयक संसदेत मंजूर झालेले आहे. पण भाजपाला महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक आणायचे आहे. देवेंद्र फडणवीस व भाजपा नेते करत असलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.

एसआयआरचे काम घाईगडबडीत..
एसआयआरचे काम घाईगडबडीत सुरु आहे.१७ ऑगस्टची मुद्दत ही आणखी दोन तीन महिने ठेवली असती तर काम सुरुळीत झाले असते. भाजपा मतचोरी करत होते पण आता तर मतदार याद्याही चोरत आहेत, हा प्रकार हुकूमशाहीकडे घेऊन जाणारा आहे. नागपुरमधील हैदराबाद हाऊसमध्ये बीएलओ यांना बोलावण्यात आले. हे हैदराबाद हाऊस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान व कार्यालय आहे, या ठिकाणी बीएलओ यांनी मॅपिंगचे सर्व दस्ताऐवज घेऊन बोलावून घेतले गेले, अशाच पद्धतीने त्यांना सुप्रीम कोर्ट व हाय कोर्टही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनच चालवायचे आहे का, असा प्रश्नही सपकाळ यांनी विचारला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘नाट्यछटा महोत्सवा’तून ७५ कलाकारांचा रंगमंचीय आविष्कार

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान पुण्यात...

मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची 89 रिक्त पदे तातडीने भरा-पालकमंत्री अँड आशिष शेलार

मुंबई' दि. 24 आँगस्ट 2026- मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक...

पुणे जिल्ह्यात मतदार यादीत मोठी उलथापालथ ! २८.६८ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

१७.८३ लाख मतदार अनुपस्थित; ५.९१ लाख स्थलांतरित, ३.१२ लाख...

गणेशोत्सव मंडळांना जाहिरातींच्या कमानी, स्टॉलसाठी विनामूल्य सवलत – महापौर मंजुषा नागपुरे

गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीनंतर महापौरांची पत्रकार परिषद पुणे : पुण्यातील सार्वजनिक...