पुणे जिल्ह्यात मतदार यादीत मोठी उलथापालथ ! २८.६८ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

Date:

१७.८३ लाख मतदार अनुपस्थित; ५.९१ लाख स्थलांतरित, ३.१२ लाख मयत

पुणे, दि. २४ : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात तब्बल २८ लाख ६८ हजार २२३ मतदार ‘अनकलेक्टेबल’ असल्याचे समोर आले आहे. अंतिम एएसडीडी यादीनुसार यामध्ये १ लाख ४३ हजार ९७५ मतदारांची दुबार नोंदणी असून, ३ लाख १२ हजार ४८ मतदार मयत, १७ लाख ८३ हजार ५८ मतदार अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ मतदार स्थलांतरित आहेत. तर ३८ हजार १०४ मतदारांनी गणना पत्रक जमा केलेले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ९८ हजार ४२७ अनकलेक्टेबल मतदार हडपसर विधानसभा मतदारसंघात आढळले आहेत. त्यानंतर खडकवासला मतदारसंघात २ लाख ७८ हजार ७८, चिंचवडमध्ये २ लाख ७० हजार २३, कोथरूडमध्ये २ लाख ७ हजार १०३ तर वडगाव शेरी मतदारसंघात २ लाख ४ हजार १८ अनकलेक्टेबल मतदार आहेत.

मतदारसंघनिहाय स्थिती

जुन्नर : एकूण ४६ हजार ९४६ अनकलेक्टेबल मतदार असून, त्यापैकी १३ हजार ३९४ मयत, ७ हजार ८०० अनुपस्थित, १९ हजार ९४४ स्थलांतरित आणि १२४ इतर मतदार आहेत.

आंबेगाव : एकूण ४१ हजार ५०५ मतदारांपैकी ११ हजार ९३५ मयत, ३ हजार ९८५ अनुपस्थित, २० हजार ९६२ स्थलांतरित आणि १११ इतर मतदार आहेत.

खेड-आळंदी : एकूण ५६ हजार ९४ मतदारांपैकी ११ हजार ८३६ मयत, २० हजार ९४५ अनुपस्थित, १४ हजार ६०९ स्थलांतरित आणि ११० इतर मतदार आहेत.

शिरूर : एकूण १ लाख ९ हजार ९०२ मतदारांपैकी १५ हजार ६२६ मयत, ६६ हजार १३५ अनुपस्थित, १८ हजार ८११ स्थलांतरित आणि ६२८ इतर मतदार आहेत.

दौंड : एकूण ५३ हजार ९८४ मतदारांपैकी १२ हजार ५३ मयत, ९ हजार ३४३ अनुपस्थित, २६ हजार ४२९ स्थलांतरित आणि ७९ इतर मतदार आहेत.

इंदापूर : एकूण ५२ हजार २३४ मतदारांपैकी १९ हजार ३०८ मयत, ४ हजार ६०४ अनुपस्थित, २२ हजार ८४४ स्थलांतरित आणि ८९ इतर मतदार आहेत.

बारामती : एकूण ४४ हजार ८७१ मतदारांपैकी १२ हजार २७४ मयत, ६ हजार ४४ अनुपस्थित, २० हजार ८९४ स्थलांतरित आणि ९१ इतर मतदार आहेत.

पुरंदर : एकूण १ लाख ८७ हजार ४७१ मतदारांपैकी १७ हजार ६५६ मयत, १ लाख ४१ हजार ६०५ अनुपस्थित, १८ हजार १५५ स्थलांतरित आणि २ हजार ९०४ इतर मतदार आहेत.

भोर : एकूण ९० हजार ८९७ मतदारांपैकी ११ हजार ३५३ मयत, ४५ हजार ७४८ अनुपस्थित, २५ हजार ५२७ स्थलांतरित आणि ४२० इतर मतदार आहेत.

मावळ : एकूण ९१ हजार ९२९ मतदारांपैकी ९ हजार ८६ मयत, २५९ अनुपस्थित, ७७ हजार ९५ स्थलांतरित आणि ६३ इतर मतदार आहेत.

चिंचवड : एकूण २ लाख ७० हजार २३ मतदारांपैकी १७ हजार १०७ मयत, २ लाख २० हजार ४३९ अनुपस्थित, १८ हजार १३० स्थलांतरित आणि १८३ इतर मतदार आहेत.

पिंपरी : एकूण १ लाख ६५ हजार ७९५ मतदारांपैकी १८ हजार ८२७ मयत, १ लाख १२ हजार ७३८ अनुपस्थित, २६ हजार ७५५ स्थलांतरित आणि ४७४ इतर मतदार आहेत.

भोसरी : एकूण १ लाख ७३ हजार २०७ मतदारांपैकी १४ हजार ४०२ मयत, १ लाख १७ हजार ११६ अनुपस्थित, २४ हजार ६७ स्थलांतरित आणि ४ हजार ३८३ इतर मतदार आहेत.

वडगाव शेरी : एकूण २ लाख ४ हजार १८ मतदारांपैकी १६ हजार ४८१ मयत, १ लाख ६१ हजार ५१७ अनुपस्थित, १३ हजार ६१३ स्थलांतरित आणि १ हजार ६०० इतर मतदार आहेत.

शिवाजीनगर : एकूण १ लाख २९ हजार ७३१ मतदारांपैकी १४ हजार ९६३ मयत, ७३ हजार २५८ अनुपस्थित, ३७ हजार ४८५ स्थलांतरित आणि १४७ इतर मतदार आहेत.

कोथरूड : एकूण २ लाख ७ हजार १०३ मतदारांपैकी १४ हजार ४१८ मयत, १ लाख ६६ हजार ८९० अनुपस्थित, १९ हजार ९५६ स्थलांतरित आणि १ हजार ६८६ इतर मतदार आहेत.

खडकवासला : एकूण २ लाख ७८ हजार ७८ मतदारांपैकी १४ हजार १७९ मयत, २ लाख ३२ हजार ८०७ अनुपस्थित, २२ हजार ३७३ स्थलांतरित आणि १ हजार ८६४ इतर मतदार आहेत.

पर्वती : एकूण १ लाख ५१ हजार ८८२ मतदारांपैकी १६ हजार ३३२ मयत, ६ हजार ६३१ अनुपस्थित, १ लाख २४ हजार ९६८ स्थलांतरित आणि ३१ इतर मतदार आहेत.

हडपसर : एकूण २ लाख ९८ हजार ४२७ मतदारांपैकी १४ हजार ७१८ मयत, २ लाख ५७ हजार १३० अनुपस्थित, १३ हजार २३० स्थलांतरित आणि ६ हजार ४३९ इतर मतदार आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट : एकूण १ लाख २१ हजार ५७७ मतदारांपैकी ११ हजार ५८१ मयत, ९० हजार ९४३ अनुपस्थित, ९ हजार ५०९ स्थलांतरित आणि ५ हजार ८०५ इतर मतदार आहेत.

कसबा पेठ : एकूण ९२ हजार ५४९ मतदारांपैकी २४ हजार ५१९ मयत, ३७ हजार १२१ अनुपस्थित, १५ हजार ६८२ स्थलांतरित आणि १० हजार ८७३ इतर मतदार आहेत.

विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान मतदारांची दुबार नोंदणी, मृत्यू, स्थलांतर, अनुपस्थिती तसेच गणना पत्रक जमा न करण्याच्या कारणांमुळे या मतदारांचा ‘अनकलेक्टेबल’ यादीत समावेश करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची 89 रिक्त पदे तातडीने भरा-पालकमंत्री अँड आशिष शेलार

मुंबई' दि. 24 आँगस्ट 2026- मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक...

गणेशोत्सव मंडळांना जाहिरातींच्या कमानी, स्टॉलसाठी विनामूल्य सवलत – महापौर मंजुषा नागपुरे

गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीनंतर महापौरांची पत्रकार परिषद पुणे : पुण्यातील सार्वजनिक...

कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्गो कार्यालयाचे उत्साहात उ‌द्घाटन मुंबई-...

फडणवीसांनी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करू नये:काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांचा मुख्यमंत्रीपदाच्या गरिमेचा सल्ला

पुणे-काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...