अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण

Date:

पुणे – अर्थपूर्ण शब्द आणि प्रसंगानुसार बांधलेली चाल, सुरेल आवाज, लोकप्रिय नट, रमणीय चित्रीकरण स्थळे…असा माहौल रसिकांच्या मनात जागविणारी जादू ‘मॅजिक ऑफ बर्मन्स’ या कार्यक्रमातून सोमवारी रसिकांनी अनुभवली.

३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या दुसऱ्या माळेची सायंकाळ श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे  हिंदी चित्रपटसृष्टीतील सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन, या पितापुत्रांच्या जोडीने गाजवलेल्या गीतांमुळे स्मरणीय ठरली. कृष्णधवल काळापासून ते रंगीत चित्रपटांच्या काळापर्यंतचा सांगीतिक प्रवासही यातून पुढे आला.

प्रारंभी ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या तैलचित्रास महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. मधू कांबीकर यांच्या ‘शापित’ चित्रपटातील गाजलेल्या भूमिकेचा उल्लेख करून आबा बागुल म्हणाले की, ‘शापित’ ते ‘एक होता विदूषक’ हा त्यांचा चित्रपट प्रवास थक्क करणारा होता. अतिशय प्रभावी अभिनय करणाऱ्या मधु कांबीकर या उत्तम लावणी सम्राज्ञी होत्या. त्यांच्या निधनाने आपण एका गुणी कलावंतास मुकलो. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, विलास रत्नपारखी आदि उपस्थित होते.   

कला, संस्कृती आणि संगीताचा संगम साधणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवात आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांच्या पुढाकाराने मॅजिक ऑफ बर्मन्स हा कार्यक्रम पंचम क्रिएशन्स आणि लिओ डिझाईन्स यांनी प्रस्तुत केला. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ संगीतकार एस. डी. बर्मन आणि नंतर त्यांचे सुपुत्र राहुल देव बर्मन, यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा गीतांची निर्मिती करून, खरोखर एक जादूभरे वातावरण निर्माण केले. त्या वातावरणाचा पुनःप्रत्यय मॅजिक आफ बर्मन्स या सादरीकरणातून रसिकांनी सोमवारी घेतला.

प्यार करनेवाले, दिवाना मुझसा नही, तुमने मुझे देखा, ख्बाव हो तुम या कोयी हकीकत, ये दिल ना होता बेचारा, जब हम जवा होंगे, घुंघटा, गुलाबी आखें, पूछो ना कैसे मैने रैन बिताई, नाचे मन मोरा मगन, होटों पें ऐसी बात, बचना ऐ हसीनों, मेहबूबा मेहबूबा, लेकर हम दिवाना दिल, ये जवानी है दिवानी, कर ले प्यार करले, काटा लगा, यम्मा यम्मा, कैसे कब कहा, दिन ढल जाये, तेरे मेरे सपने, ये शाम मस्तानी, प्यार दिवाना होता है, रूप तेरा मस्ताना, लडका हाये अल्ला, अरे यार मेरी तुम भी हो गजब, चूडी नही ये मेरा दिल है….अशी सदाबहार गाणी मकरंद पाटणकर, रूपाली आनंद आणि डॉ. विवेक पांडे यांनी सादर केली. चिंतन मोढा (की बोर्ड), अभिजीत भदे (ड्रम्स), अमन सय्यद (की बोर्ड), प्रथमेश मोरे (सॅक्सोफोन), हर्षद गनबोटे (तबला, ढोलक), राहुल भाटे (गिटार), आनंद घोगरे (ऑक्टोपॅड) यांनी अनुरूप साथसंगत केली. आकाश सोळंकी यांनी निवेदन केले. कार्यक्रमाची संकल्पना माधुरी जोशी आणि आनंद घोगरे यांची होती.

कलाकारांचे सत्कार आबा बागुल,  जयश्री बागुल, अमित बागुल, जयवंत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, घनश्याम सावंत आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांतून सामाजिक समतेची प्रेरणा घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे

महात्मा फुले यांना भारतरत्न मिळावे आणि फुले वाड्याच्या विकासाला...

पथक गेले की पुन्हा अतिक्रमण ! रविवार पेठेतील अतिक्रमणाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार : महापौर मंजुषा नागपुरे

कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याची व्यापाऱ्यांची तक्रार; बाजारपेठ अतिक्रमणमुक्त...

डिलिमिटेशन विधेयक राष्ट्रविरोधी; पाठिंबा देणारे खासदार इतिहासात ‘गद्दार’ ठरतील : संजय राऊत

लोकसभेचे महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप; विधेयकाच्या समर्थनासाठी...

डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा म्हणजे मोदी सरकारला मदत करणारी भूमिका : सचिन सावंत

इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय व्हायला हवा होता; राष्ट्रवादीच्या भूमिकेवर...