पुणे–बंगळुरू महामार्ग दिवसभर ठप्प: राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

Date:

पुणे- महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकातील हत्तरकी टोल नाका परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आंदोलक शेतकऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या देत आंदोलन अधिक तीव्र केले आहे. धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली असून, रस्त्यावरच पंगती बसवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या आंदोलनाला आता मोठ्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दरम्यान, साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीबाबत केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेते यांच्यात सोमवारी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत साखरेचा किमान हमीभाव ५० रुपये प्रतिकिलो करणे, सी-हेव्ही इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर करणे आणि साखर हंगाम लवकर सुरू केल्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देणे, या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या होत्या.

मात्र, या बैठकीत कोणताही ठोस आणि सकारात्मक निर्णय न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर आरपारच्या लढाईची हाक दिली. त्यानंतर हजारो शेतकरी कोगनोळी आणि हत्तरकी टोल नाका परिसरात एकवटले आणि बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले.

आंदोलनाची माहिती मिळताच दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर वाहनांच्या रांगा वाढू लागल्याने पोलिसांनी वाहतूक रोखून ती अंतर्गत ग्रामीण आणि पर्यायी मार्गांवर वळवण्यास सुरुवात केली. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे–बेंगळुरू महामार्ग बंद ठेवण्यात आला असून, प्रशासनाने प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

जोपर्यंत केंद्र सरकारकडून मागण्यांबाबत लेखी निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत महामार्ग एक इंचही मोकळा केला जाणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी टोल नाक्यावरच मुक्काम ठोकण्याची तयारी केली असून, कागल आणि निपाणी तालुक्यातील गावांमधून पिठलं-भाकरीसह सामूहिक जेवणाची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे हे आंदोलन पुढील काही काळ आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला- अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे आदेश

महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६:...

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) व एमटीपी (MTP) आढावा बैठक; दलालांची...

अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण

पुणे – अर्थपूर्ण शब्द आणि प्रसंगानुसार बांधलेली चाल, सुरेल...

दुष्काळग्रस्तांना पाणी, चारा आणि रोजगाराचा प्रत्यक्ष लाभ मिळावा : डॉ. नीलम गोऱ्हे

सर्वांना सुखी ठेवा, कुणालाही आत्महत्या करावीशी वाटू नये अशी...