मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची 89 रिक्त पदे तातडीने भरा-पालकमंत्री अँड आशिष शेलार

Date:

मुंबई’ दि. 24 आँगस्ट 2026-

मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक शाळा, पालिकेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील भौतिक सुविधा तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची एकुण 89 पदे रिक्त आहेत. ही बाब चिंताजनक असून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी आज प्रशासनाला दिले.

मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व शाळांमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी शासन व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शाळांच्या भौतिक सुविधांची नियमित तपासणी आणि देखरेख याबाबत त्यांनी संपूर्ण आढावा घेतला.

मुंबई महापालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या मान्यतेने पूर्व उपनगरातील 240, पश्चिम उपनगरातील 265 अशा एकुण 505 माध्यमिक शाळा असून त्यांची भौतिक सुविधा तपासणी करण्यासाठी केवळ पंधरा शिक्षण उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक असून यांची 18 पदे रिक्त आहेत.

तर मुंबई महापालिकेच्या 1 हजार132 प्राथमिक शाळा असून 1 खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत. अशा एकुण 2 हजार132 शाळांच्या भौतिक सुविधा तपासणीसाठी असलेले विभाग निरिक्षक केवळ 11 असून तब्बल 71 पदे रिक्त आहेत.

शाळांमध्ये स्वच्छता गृहे, इमारत, वर्ग खोल्या, लाईट, पाणी, सुरक्षा या सारख्या 10 विविध भौतिक सुविधांंची तपासणी महापालिका आणि राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांमार्फत दर तीन वर्षांनी होते.

मात्र, या पदावरील अधिकाऱ्यांची 89 पदे रिक्त असल्याचे आजच्या बैठकीत निदर्शनास आले. मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने शाळांच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेची प्रभावी व नियमित तपासणी करण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवर होऊ शकतो. म्हणून तपासणी अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करुन शाळांच्या तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे स्पष्ट निर्देश एँड. आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये आणि प्रत्येक शाळेत आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी नियमित तपासणी, अहवाल आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची प्रभावी यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे जिल्ह्यात मतदार यादीत मोठी उलथापालथ ! २८.६८ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

१७.८३ लाख मतदार अनुपस्थित; ५.९१ लाख स्थलांतरित, ३.१२ लाख...

गणेशोत्सव मंडळांना जाहिरातींच्या कमानी, स्टॉलसाठी विनामूल्य सवलत – महापौर मंजुषा नागपुरे

गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीनंतर महापौरांची पत्रकार परिषद पुणे : पुण्यातील सार्वजनिक...

कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्गो कार्यालयाचे उत्साहात उ‌द्घाटन मुंबई-...