कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध-भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

Date:

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्गो कार्यालयाचे उत्साहात उ‌द्घाटन

मुंबई- नव्याने सुरु करण्यात आलेल्या संघाच्या कार्यालयामुळे कार्गो विभागातील कामगारांना संघटनेशी थेट संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कामगारांच्या अडचणी, सेवा-संबंधित प्रश्न, वेतन व भत्ते, कामाच्या अटी, रोजगाराची सुरक्षितता, कायदेशीर हक्क आणि इतर औद्योगिक प्रश्न याबाबत संघटना अधिक प्रभावीपणे काम करू शकेल असा विश्वास अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी विविध कामगार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने सहार रोड येथील कार्गो परिसरातील संघाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संघाचे आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महासंघाचे सरचिटणीस सुहास माटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय कर्मचारी सेनेतील शेकडो वाहतूकदार आणि कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघात प्रवेश केला. तसेच, वाहतूकदारांची मोठी संघटना असलेली ऑल इन वन ओनर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशन ही अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाशी संलग्न झाली आहे. त्याचप्रमाणे, AIASL मधील भारतीय कामगार सेना (उबाठा) चे सुमारे 450 सदस्य कामगार आज अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सदस्य झाले. या प्रवेशामुळे कार्गो विभागात संघटनेची ताकद आणि प्रभाव अधिक मजबूत होणार आहे.
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, हा प्रवेश केवळ सदस्यसंख्येतील वाढ म्हणून पाहता येणार नाही, तर कार्गो विभागातील कामगारांमध्ये वाढत असलेल्या विश्वासाचे आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्यपद्धतीला मिळत असलेल्या व्यापक प्रतिसादाचे प्रतीक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमपीएमएलच्या सर्व सेवकांना पेन्शन; कागदपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी; हजारो निवृत्त कर्मचारी, कुटुंबीयांना दिलासा पुणे...

‘नाट्यछटा महोत्सवा’तून ७५ कलाकारांचा रंगमंचीय आविष्कार

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान पुण्यात...

मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची 89 रिक्त पदे तातडीने भरा-पालकमंत्री अँड आशिष शेलार

मुंबई' दि. 24 आँगस्ट 2026- मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक...