फडणवीसांनी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करू नये:काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांचा मुख्यमंत्रीपदाच्या गरिमेचा सल्ला

Date:

पुणे-काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. मोदी-शहा यांना खूश करण्यासाठी काँग्रेसवर सातत्याने तथ्यहीन टीका करण्याच्या नादात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखावी आणि बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करू नये, असे तिवारी म्हणाले.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही फडणवीस दिशाभूल करणारी विधाने करत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. सप्टेंबर २०२३ मध्ये लोकसभेत मंजूर झालेल्या ३३ टक्के महिला आरक्षणाच्या घटनादुरुस्तीमध्ये परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय आरक्षण लागू करू नये, असे कुठेही नमूद नाही. ही प्राथमिक माहितीही फडणवीसांना नसावी, याचे आश्चर्य वाटते, असे तिवारी म्हणाले.

महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध असल्याचे वारंवार सांगून फडणवीस नेमके काय सिद्ध करू इच्छितात, असा सवाल तिवारी यांनी केला. तथ्य तपासून आणि घटनात्मक तरतुदी समजून घेऊन बोलण्याऐवजी विरोधकांवर आरोप करण्याची घाई करणे मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही, असेही त्यांनी नमूद केले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने महिला आरक्षणाचा मुद्दा उमेदवारीच्या पातळीवर किती गांभीर्याने घेतला, याचे आत्मपरीक्षण फडणवीसांनी करावे, असे तिवारी म्हणाले. महिला आरक्षणाची घोषणा करूनही भाजपने त्या प्रमाणात महिला उमेदवारांना संधी दिली नाही. महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा काँग्रेस-महाविकास आघाडीला मिळाल्या, तर भाजप-महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या, या निकालातून जनतेने भाजपच्या राजकारणाला दिलेला कौल फडणवीसांनी समजून घ्यावा, असे तिवारींनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या महिला धोरणाबाबत चुकीची व दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्याऐवजी फडणवीसांनी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने भाषणबाजीपेक्षा वैचारिक प्रगल्भता, तथ्याधारित भूमिका आणि घटनात्मक मूल्यांचे भान दाखवणे अपेक्षित आहे. त्यामुळे फडणवीसांनी वायफळ बोलघेवडेपणा कमी करून मुख्यमंत्रीपदाची गरिमा जपावी, असा सल्ला तिवारी यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमपीएमएलच्या सर्व सेवकांना पेन्शन; कागदपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी; हजारो निवृत्त कर्मचारी, कुटुंबीयांना दिलासा पुणे...

‘नाट्यछटा महोत्सवा’तून ७५ कलाकारांचा रंगमंचीय आविष्कार

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान पुण्यात...

मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची 89 रिक्त पदे तातडीने भरा-पालकमंत्री अँड आशिष शेलार

मुंबई' दि. 24 आँगस्ट 2026- मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक...