महापालिकेत नोकरीचे आमिष; ६७ लाख उकळल्याचा आरोप,पीएमसीच्या निवृत्त मुख्याध्यापकासह पाच जणांवर गुन्हा

Date:

बनावट वैद्यकीय पत्रे, नियुक्ती आदेश अन् ओळखपत्रेही दिली

पुणे : पुणे महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. शिपाई, पोलीस शिपाई आणि पर्यवेक्षक पदांवर नोकरी मिळवून देण्याचे सांगत पाच नोकरी इच्छुकांकडून टप्प्याटप्प्याने तब्बल ६७ लाख रुपये घेतल्याच्या आरोपावरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पुणे महापालिकेच्या शाळेतील एका निवृत्त मुख्याध्यापकाचाही समावेश आहे.

संजय अनंता भालेराव (रा. कर्वेनगर, पुणे; निवृत्त मुख्याध्यापक, पीएमसी शाळा), शिवानंद बाळासाहेब पाटील (रा. कर्वेनगर), अमित दरवटकर, आनंद लोंढणवार आणि अमित सुहास देशपांडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खडकवासला परिसरातील २३ वर्षीय तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा कथित प्रकार २०२४ ते जून २०२६ या कालावधीत घडला. वडगाव येथील आनंद देवराम डाफळ यांच्या घरी आर्थिक व्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदार नांदोषी, खडकवासला परिसरातील रहिवासी आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याची संजय भालेराव यांच्याशी ओळख झाली. भालेराव यांनी पुणे महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर भालेराव आणि अन्य आरोपींनी तक्रारदारासह आणखी चार जणांना विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी पाचही जणांकडून वेळोवेळी एकूण ६७ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

बनावट कागदपत्रांमुळे बसला नोकरी लागल्याचा विश्वास

हा प्रकार केवळ नोकरीचे आश्वासन आणि पैसे घेण्यापुरता मर्यादित राहिला नाही. नोकरीची प्रक्रिया खरी असल्याचा विश्वास बसावा यासाठी उमेदवारांना पुणे महापालिकेचे शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या असलेली वैद्यकीय तपासणीची पत्रे देण्यात आल्याचा आरोप आहे.

ही पत्रे खरी असल्याचे समजून तक्रारदार आणि अन्य उमेदवारांनी वैद्यकीय तपासणीही करून घेतली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळाली.

पुढे महापालिकेचे शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या असलेले कथित नियुक्ती आदेश आणि ओळखपत्रे उमेदवारांना देण्यात आली. त्यामुळे आपली पुणे महापालिकेत खरोखरच नोकरी लागली असल्याचा विश्वास त्यांना बसला.

मात्र, नियुक्ती आदेशांची सत्यता पडताळण्यासाठी उमेदवारांनी पुणे महापालिकेशी संपर्क साधल्यानंतर त्यांना धक्का बसला. संबंधित नियुक्ती आदेश बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उमेदवारांनी दिलेले पैसे परत मागितले. मात्र पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अखेर याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोटस कोर्ट प्रकल्पातील ११० सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा आरोप; बिल्डर दाम्पत्यावर गुन्हा

सुविधा न दिल्याचा, मंजूर आराखड्यात बदल करून दोन अतिरिक्त...

हंगामी स्थलांतरामुळे कोणत्याही मुलाचे बालपण हिरावले जाऊ नये – आयुष्मान खुराना

जालन्यात युनिसेफच्या ‘कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण’ कार्यक्रमाला...

गणेशोत्सव, दहीहंडीत उत्साह हवा; पण ध्वनी प्रदूषणाची मर्यादा राखलीच पाहिजे

ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान बालकांचाही विचार करा; पोलीस आयुक्तांनी...

‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’श्रीराम पुजारी जन्मशताब्दी सांगता सोहळ्यास सुरुवात

पुणे : उच्च प्रगल्भता, भावपूर्णता लाभलेली बनारसी घराण्याची गायकी...