बावधन बुद्रुकमधील 5 अनधिकृत RMC प्लँट्सवर महापालिकेची मोठी कारवाई; 35 हजार चौ.फुट बांधकाम निष्कासित

Date:

पुणे-बावधन बुद्रुक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांटविरोधात पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) धडक कारवाई केली. या कारवाईत पाच अनधिकृत आरएमसी प्लांटमधील सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच, या पाचही प्लांटचा वीजपुरवठा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून कायमस्वरूपी बंद करून घेण्यात आला. आकाशचिन्ह विभागाने प्लांटच्या ऑपरेटिंग रूम सील केल्याने संबंधित प्लांट बंद करण्यात आले आहेत.

बावधन बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक २२१, २२३, २२४ आणि २२५ पार्ट या परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या आरएमसी प्लांटवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये द मार्क इन्फ्रा (सर्व्हे क्रमांक २२३), केईसी इंटरनॅशनल लिमिटेड (सर्व्हे क्रमांक २२१/२, २२१/३, २२४/२, २२४/५), डीएनव्ही इन्फ्राकॉन एलएलपी (सर्व्हे क्रमांक २२५/२), यशाई इन्फ्रा आणि अल्ट्राटेक आरएमसी (दोन्ही सर्व्हे क्रमांक २२१/१) या पाच आस्थापनांचा समावेश आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या समन्वयाने ही कारवाई केली. कारवाईसाठी नऊ जेसीबी, दोन गॅस कटर, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ६० जवान, १५ पोलीस कर्मचारी, पाच अतिक्रमण निरीक्षक आणि ४० बिगारी सेवकांची यंत्रणा तैनात करण्यात आली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

कारवाईदरम्यान उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांनी मार्गदर्शन केले. शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आणि अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांच्या सूचनेनुसार बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता भास्कर हांडे आणि शाखा अभियंता अजय फाले यांनी कारवाईचे नियोजन केले. संबंधित विभागांच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई पूर्ण केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोककलेच्या नभांगणातील ‘मधुरंग’; लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर…!

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मधुबाईंसोबत धरलेला...

गुहागर येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर करा-सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

एमटीडीसीसोबत संयुक्त भागीदारीत प्रकल्प उभारण्याच्या सूचना मुंबई, दि. १३ ऑक्टोबर...