गणेशोत्सव, दहीहंडीत उत्साह हवा; पण ध्वनी प्रदूषणाची मर्यादा राखलीच पाहिजे

Date:

ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान बालकांचाही विचार करा; पोलीस आयुक्तांनी सर्व घटकांशी संवाद साधावा — जागृत पुणेकरांची अपेक्षा

पुणे : गणेशोत्सव आणि दहीहंडी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अविभाज्य घटक असले, तरी उत्सवाच्या नावाखाली होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान बालके, नुकत्याच प्रसूत झालेल्या माता तसेच रुग्णालये आणि दवाखान्यांतील रुग्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे. ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत निर्धारित मर्यादांचे काटेकोर पालन व्हावे आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रश्नाकडे जातीने लक्ष द्यावे, अशी भूमिका जागृत पुणेकरांकडून मांडली जात आहे.

पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती . गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणारे स्पीकर व ध्वनिक्षेपक, त्यावरील निर्बंध, डेसिबल मर्यादा आणि ध्वनीव्यवस्थेसाठी देण्यात येणाऱ्या परवानग्या या विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असल्याने उत्सवाच्या उत्साहावर अनावश्यक निर्बंध लादले जाऊ नयेत, अशी भूमिका काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जात असल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावरही काही कार्यकर्त्यांकडून ‘स्पीकरवर बंदी मान्य नाही’ अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.

मात्र, गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचना आणि अडचणी समजून घेतल्या जातात, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणाचा थेट परिणाम होणाऱ्या नागरिकांचे म्हणणेही ऐकून घेणे आवश्यक असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे.ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, रुग्णालयांचे प्रतिनिधी, विविध आजारांनी त्रस्त नागरिक, नुकत्याच प्रसूत झालेल्या महिला तसेच लहान बालके असणाऱ्या मातांशीही प्रशासन आणि पोलिसांनी संवाद साधावा. हे नागरिक संघटित नसल्यामुळे त्यांचा आवाज निर्णय प्रक्रियेत दुर्लक्षित होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी होत आहे.

उत्सवाला विरोध नाही; अतिरेकाला, धिंगाण्याला विरोध आहे, अशी या नागरिकांची भूमिका आहे. भक्तिभाव, मांगल्य आणि पुण्याच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपत उत्सव साजरा व्हावा. मात्र उत्सवाच्या नावाखाली अनियंत्रित ध्वनी प्रदूषण किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल असे प्रकार खपवून घेतले जाऊ नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्साहात साजरी व्हावी; मात्र त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेचा अधिकारही जपला जावा. उत्सवाचा आनंद आणि नागरिकांचे आरोग्य यांचा समतोल राखण्याची जबाबदारी मंडळे, आयोजक, पोलीस आणि प्रशासन या सर्वांचीच आहे, अशी भूमिका पुणेकरांकडून मांडली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेकायदा सदनिकांच्या खरेदी-विक्री नोंदणीवर बंदी; नियम मोडणाऱ्या दुय्यम निबंधकांवरही कारवाई

मुंबई : राज्यातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना आणि त्यातून सामान्य...

पाच वर्षांच्या आयरिस डेटाने उघड केला बँक भरती घोटाळा; 180 जण नोकरीत आणि 257 संशयित

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भरती परीक्षांमध्ये बनावट उमेदवार...