भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; पूर्वप्रशिक्षणासाठी मोफत प्रशिक्षण

Date:

पुणे दि.19: भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना Services Selection Board (SSB) मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक रोड, नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी 21 सप्टेंबर 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच निवास व भोजनाची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी उमेदवाराने कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. Combined Defence Services Examination (CDSE-UPSC) किंवा National Defence Academy Examination (NDA-UPSC) उत्तीर्ण होऊन SSB मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार, तसेच NCC Special Entry साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असलेले उमेदवार पात्र राहतील. याशिवाय Technical Graduate Course साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असलेले तसेच University Entry Scheme साठी SSB कॉल लेटर असलेले किंवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे 18 सप्टेंबर 2026 पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरील DSW Portal → Resources → PCTC Nashik → SSB-69 या विभागातील प्रवेश अर्ज डाउनलोड करून त्याच्या दोन प्रती भरून सोबत आणाव्यात. तसेच संबंधित पात्रता प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, SSB पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. ई-मेल : training. pctcnashik@gmail.com, दूरध्वनी : 0253-2451032, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 यावर संपर्क साधता येईल.

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या मोफत SSB पूर्वप्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, संशयित पोलिसांच्या ताब्यात, नराधमाला फाशीच द्या- ग्रामस्थ

जुन्नर -तालुक्यातील पिंपळवंडी येथे अवघ्या 9 वर्षांच्या चिमुकलीवर...

धर्मस्वातंत्र्य कायदा लागू हाेण्यापूर्वीच पुण्यात गुन्हे दाखल झाल्याचे उघड:28 ऑगस्टला अमलात येणार, पण 7 ऑगस्टलाच गुन्हे दाखल

पुणे-महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा १७ ऑगस्टला मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी...

उत्तर भारतात पावसाचा कहर; प्रयागराज जलमय, हिमाचल-उत्तराखंडमध्ये ६ मृत्यू

ओडिशात ९ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित; सहा जिल्ह्यांसाठी...

राँग साइड वाहनचालकांवर कठोर कारवाई करा; सकाळीही ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ तपासणी राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षेसह वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची संख्या वाढवून दिवाळीपर्यंत कृती...