युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

Date:

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर अप्रत्यक्ष निशाणा

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या **‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’**च्या प्रचार शुभारंभात युवा नेते युगेंद्र पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत कारखान्याचा कारभार, उमेदवारांची निवड, पारदर्शकता आणि भाजपच्या बारामतीतील राजकीय प्रवेशावर अनेक सवाल उपस्थित केले.

प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा, आरोप-प्रत्यारोपांना बळी न पडता सभासदांच्या हितावर भर द्यावा, असे आवाहन युगेंद्र पवार यांनी केले. “दुसऱ्याला शिव्या देऊन कोणी मोठं होत नाही. विरोधक चिखलफेक करतील, पण आपण आपला प्रचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असे ते म्हणाले.

युगेंद्र पवार यांनी निवडणुकीतील चिन्हांवरूनही राजकीय टोले लगावले. “किटली हे आपले चिन्ह आहे. किटलीशिवाय कपबशी भरत नाही,” असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

दुसरीकडे, “शिट्टी आपण सावध करण्यासाठी वाजवतो. त्यामुळे सभासदांना सावध करा, भाजप इथे आलेला आहे,” असे म्हणत त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलवरही टीका केली.

युगेंद्र पवार यांनी आपल्या प्रचार दौऱ्यांचा उल्लेख करत आतापर्यंत 80 हून अधिक गावांमध्ये भेटी दिल्याचा दावा केला. “अनेक ठिकाणी लोक म्हणतात की आता पवार साहेबांशिवाय पर्याय नाही,” असे ते म्हणाले. अजित पवार कारखान्याच्या कारभारात असताना शरद पवार यांनी संस्थेकडे फारसे लक्ष दिले नाही; मात्र आता परिस्थिती बदलली असून कारखाना सभासदांच्या हितासाठी चालला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आपल्या पॅनलमधील उमेदवार सामान्य पार्श्वभूमीतील असले तरी ते सक्षम आणि उच्चशिक्षित आहेत, असे सांगताना त्यांनी विरोधकांच्या आर्थिक ताकदीवरही टोला लगावला. “आमच्या उमेदवारांकडे मोठ्या गाड्या नसतील, 5555 नंबर दिसणार नाही; पण त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे,” असे ते म्हणाले.

महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. आपल्या पॅनलमध्ये तीन महिलांना उमेदवारी दिल्याचे सांगत नव्या गावांना आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले.

कारखान्यातील कामगार भरती वशिल्यावर नव्हे तर गुणवत्तेवर झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. साखरेसोबत विविध उपपदार्थांचे उत्पादन वाढवून कारखान्याचे उत्पन्न वाढवता येईल आणि त्यातून सभासदांना चांगला दर देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या अनुभवाचा उल्लेख करत सत्ता असो वा नसो, त्यांच्या माध्यमातून कामे होत राहतात, असा दावा केला. सहकार क्षेत्रातील शरद पवार यांच्या अनुभवाचा लाभ सोमेश्वर कारखान्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.

भाजपवर थेट निशाणा साधताना युगेंद्र पवार म्हणाले, “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करत आहे.” स्थानिक सहकारी संस्थांच्या माध्यमातून बारामतीच्या राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी शरद पवार यांना आपले राजकीय गुरू मानल्याचा संदर्भ देत, आगामी काळात बारामतीच्या विकासाच्या प्रश्नांवर शरद पवार त्यांच्याशी संवाद साधतील, असेही त्यांनी म्हटले.

शेवटी सभासदांना आवाहन करत युगेंद्र पवार म्हणाले, “आमचे पॅनल विजयी झाले तर मी आठवड्यातून किमान एक दिवस कारखान्यासाठी देईन. कारभार समजून घेईन, गरज पडली तर शरद पवार साहेबांचे मार्गदर्शन घेईन. पण कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवू.”

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत असल्याने ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता बारामतीच्या व्यापक राजकीय समीकरणांनाही दिशा देणारी ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव...

डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये दोन नर माळढोक पक्षी पुन्हा नैसर्गिक अधिवासात

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते जैसलमेरमध्ये मुक्तता;...