३२० एचपी इंजिन, AI-सक्षम ड्राइव्ह मोड आणि ४८ तासांची अपटाईम गॅरंटी; ‘प्रॉफिट का रॉकेट’ म्हणून बाजारात
मुंबई : महिंद्रा ट्रक अँड बसने नवीन ब्लेजो i-TRK हे नेक्स्ट-जनरेशन हेवी कमर्शियल व्हेईकल लाँच केले आहे. ट्रान्सपोर्टर्स आणि फ्लीट मालकांसाठी अधिक कमाई, अधिक उत्पादकता आणि कमी ऑपरेटिंग खर्च या उद्देशाने ही नवी श्रेणी विकसित करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने या ट्रकसाठी ‘प्रॉफिट का रॉकेट’ ही संकल्पना मांडली आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ब्लेजो i-TRK मध्ये १० टक्क्यांपर्यंत उत्तम इंधन कार्यक्षमता देण्याचे उद्दिष्ट असून, AI-सक्षम iFuelSmart Auto Drive Mode, TurboMax Turbocharger आणि OptiFuel Air Compressor यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे पाच वर्षांत प्रति ट्रक १५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त नफा मिळू शकतो, असा कंपनीचा दावा आहे.
ब्लेजो i-TRK श्रेणीमध्ये महिंद्राचे ३२० एचपी mPower इंजिन देण्यात आले असून ते ७.२ लिटर क्षमतेचे आहे. हे इंजिन ११०० ते १७०० आरपीएमच्या श्रेणीत ११०० एनएम टॉर्क निर्माण करते.
या ट्रकचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने दिलेली ४८ तासांची अपटाईम गॅरंटी. ठरलेल्या वेळेत वाहन पुन्हा रस्त्यावर न आल्यास पात्र ग्राहकांना दररोज १० हजार रुपये देण्याची तरतूद असल्याचे महिंद्राने म्हटले आहे.
ब्लेजो i-TRK मध्ये iMAX 2.0 कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. त्यातून रिअल-टाईम वाहन माहिती, प्रिडिक्टिव्ह डायग्नोस्टिक्स, ड्रायव्हर वर्तनाचे निरीक्षण, सर्व्हिस मॅनेजमेंट तसेच फ्लीट ऑपरेशन्सची माहिती उपलब्ध होते. रिमोट एसी मॅनेजमेंट आणि अनधिकृतपणे इंजिन सुरू होऊ नये यासाठी रिमोट वाहन नियंत्रणासारखी वैशिष्ट्येही देण्यात आली आहेत.
चालकांच्या सोयीसाठी एसी केबिन, सस्पेंडेड सीट, क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथ म्युझिक सिस्टम आणि हँड्सफ्री कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. ब्लेजो i-TRK तीन रंगांमध्ये आणि विविध व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
महिंद्रा ट्रक्स अँड बसेसचे अध्यक्ष विनोद सहाय यांनी ब्लेजो i-TRK हे अधिक बुद्धिमान आणि नफाक्षम ट्रकिंगकडे जाणारे पाऊल असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून कमर्शियल मोबिलिटीमध्ये नवे मानक निर्माण करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

