रेती वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच; वनपाल रंगेहाथ जाळ्यात

Date:

गोंदियात ACBची कारवाई; वनपालासह तीन वन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

गोंदिया : घराच्या बांधकामासाठी आणलेल्या रेतीच्या वाहतुकीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात वनपालासह तीन वन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ACBच्या प्रेस नोटनुसार, तक्रारदाराच्या घराचे बांधकाम सुरू असून मार्च २०२६ मध्ये गावाजवळील नाल्यातून घरासाठी रेती आणली जात होती. त्यावेळी संबंधित वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून रेती उपसा आणि वाहतुकीबाबत कारवाई न करण्यासाठी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

त्यानंतर चर्चेदरम्यान ही मागणी २० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे ACBच्या पडताळणीत समोर आले. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने १० ऑगस्ट रोजी गोंदिया ACBकडे तक्रार केली.

११ ऑगस्ट रोजी केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. राजुली परिसरातील कार्यालयात वनपाल रमेश सकीरामजी पवार यांनी इतर दोन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत २० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप असून, ACBच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

या प्रकरणात वनपाल रमेश सकीरामजी पवार, वनरक्षक निहालोत्पल हिरालाल शिकारे आणि वनरक्षक बिंदू मंगलसिंग परिहार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारांकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि.१३: ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार’ तसेच...

सुबोध भावेंच्या आवाजात ‘असा घडला महाराष्ट्र’; २४ ऑगस्टपासून रेडिओ मिर्चीवर नवा शो

महाराष्ट्राच्या जडणघडणीतील अपरिचित कथा, इतिहास आणि विचार नव्या पिढीपर्यंत...

टाऊन प्लॅनिंग अधिकाऱ्याकडे २.७८ कोटींची अपसंपदा ; पत्नीवरही गुन्हा दाखल

वैध उत्पन्नापेक्षा १८.४७ टक्के अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत निष्पन्न;...