काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसाठी नाशिकमध्ये १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर, राहुल गांधी मार्गदर्शन करणार!

Date:

२४ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत शिबिर, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राष्ट्रीय व राज्यातील नेत्यांचीही उपस्थिती.

मुंबई, दि. १३ ऑगस्ट २६

काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या अध्यक्षांची निवड आणि नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे १० दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २४ ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत हे शिबिर असणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सर्व प्रशिक्षणार्थींना विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशिक्षण शिबिरात आगामी काळातील काँग्रेस पक्षाची दृष्टी आणि दिशा, पक्षासमोरील आव्हाने, संघटनात्मक तयारी, काँग्रेसची विचारधारा आणि देशाच्या राजकारणातील पक्षाची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्न, अपेक्षा, मुद्दे आणि राजकीय दृष्टिकोन यांनाही संवादात महत्त्व दिले जाणार आहे. राज्य आणि देशपातळीवरील विविध क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक आणि तज्ञ या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीय वॉर रूमचे अध्यक्ष खासदार शशिकांत सेंथिल तीन दिवस विशेष सत्रे घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेतेही प्रशिक्षणार्थींशी संवाद साधणार आहेत. सचिन राव यांच्या नेतृत्वाखालील AICC प्रशिक्षण टीम प्रशिक्षणाची धुरा सांभाळणार आहे.

‘नवी पिढी, नवे नेतृत्व आणि मजबूत संघटन’ या व्यापक दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाची रचना करण्यात आली आहे. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा अभ्यास करताना जनतेशी प्रत्यक्ष संपर्क, संघटनात्मक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वक्षमता या चारही बाबी विकसित करण्याचा प्रयत्न या प्रशिक्षणातून केला जाणार आहे. प्रशिक्षणार्थी दररोज श्रमदानात सहभागी होतील, ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात येणार आहे. श्रम, संघर्ष, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यावरही या प्रशिक्षणात भर देण्यात येणार आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रेती वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी २० हजारांची लाच; वनपाल रंगेहाथ जाळ्यात

गोंदियात ACBची कारवाई; वनपालासह तीन वन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा गोंदिया :...

टाऊन प्लॅनिंग अधिकाऱ्याकडे २.७८ कोटींची अपसंपदा ; पत्नीवरही गुन्हा दाखल

वैध उत्पन्नापेक्षा १८.४७ टक्के अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत निष्पन्न;...

१० लाखांच्या बदल्यात ३० लाखांच्या बनावट नोटांचे आमिष; नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

तळेगाव शिवारातील बंगल्यावर पोलिसांचा छापा; तेलंगणासह नाशिकमधील पाच संशयित...

CDSL IPF आणि अमर चित्र कथांकडून बहुभाषिक गुंतवणूकदार शिक्षण माहितीपट

‘द गार्डन ऑफ प्रॉस्पेरिटी’मधून अकबर-बिरबल सांगणार गुंतवणुकीचे धडे; मराठीसह...