शास्त्रीनगर चौकातील ग्रेड सेपरेटर-उड्डाणपूल प्रकल्पाला गती; मार्च २०२७ अखेर काम पूर्ण करण्याचे निर्देश

Date:

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची पाहणी; ग्रेड सेपरेटरचे काम चार महिन्यांत पूर्ण करण्यावर भर

पुणे : नगर रोडवरील शास्त्रीनगर चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामाचा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून संपूर्ण प्रकल्प मार्च २०२७ अखेर कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिले.

सध्या नगर रोडवरून येणारी वाहतूक गोल्फ चौकमार्गे मुंबईच्या दिशेने तसेच कल्याणीनगर आणि गुंजन चौकाच्या दिशेने जाते. त्यामुळे या सर्व मार्गांचा मोठा वाहतूक भार शास्त्रीनगर चौकावर येत असून परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

ही कोंडी कमी करण्यासाठी आगाखान पॅलेस ते गुंजन चौक या दिशेने सुमारे ७५० मीटर लांबीचा सहा लेनचा ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहे. तसेच आगाखान पॅलेस ते गोल्फ चौक या दिशेने सुमारे ७०० मीटर लांबीचा चार लेनचा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्तांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून ग्रेड सेपरेटरच्या कामाला तातडीने गती देण्याच्या सूचना केल्या. ग्रेड सेपरेटरचे काम पुढील चार महिन्यांत पूर्ण करण्याचे, तर ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल या संपूर्ण प्रकल्पाचे काम मार्च २०२७ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

नगर रोडवरील कोंडी कमी होण्याची अपेक्षा

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नगर रोड, कल्याणीनगर, गुंजन चौक, गोल्फ चौक तसेच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. शास्त्रीनगर चौकातील वाहतुकीचा थेट भार कमी होऊन या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलीस आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून वाहतुकीची सुरक्षितता, तांत्रिक बाबी आणि कामाचे नियोजन यांची योग्य पूर्तता करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

या पाहणीवेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, महापालिका सदस्य अश्विनी लांडगे, अविनाश साळवे, विशाल मलके, मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे, मुख्य अभियंता (पथ) राजेश बनकर, उपायुक्त आशा राऊत, सोमनाथ बनकर, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) नंदकिशोर जगताप, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संतोष वारुळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

CDSL IPF आणि अमर चित्र कथांकडून बहुभाषिक गुंतवणूकदार शिक्षण माहितीपट

‘द गार्डन ऑफ प्रॉस्पेरिटी’मधून अकबर-बिरबल सांगणार गुंतवणुकीचे धडे; मराठीसह...

आयकर विभाग, मुंबई द्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत 97 गुणवंत खेळाडूंचा समावेश

मुंबई, मुंबई आयकर विभागाने, क्रीडा कोट्याअंतर्गत 97 गुणवंत खेळाडूंचा समावेश...

रेलवन ॲप डाउनलोडने गाठला 4.76 कोटीचा टप्पा, दररोज सरासरी 10 लाख तिकिटांचे होते बुकिंग

नवी दिल्‍ली- आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटांची डिजिटल पद्धतीने खरेदी केले...

कौशल्याधारीत शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा; चंद्रकांत पाटील यांचे शिक्षण संस्थांना आवाहन

पुणे सध्याच्या काळात कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व असून ग्रामीण...