आयकर विभाग, मुंबई द्वारे क्रीडा कोट्याअंतर्गत 97 गुणवंत खेळाडूंचा समावेश

Date:

मुंबई,

मुंबई आयकर विभागाने, क्रीडा कोट्याअंतर्गत 97 गुणवंत खेळाडूंचा समावेश केला असून, सार्वजनिक सेवेत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्याची आणि उच्च दर्जाच्या क्रीडा प्रतिभेला वाव देण्याची त्यांची बांधिलकी यामुळे अधिक दृढ झाली आहे. आज आयकर भवन, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात आयकर मुंबईचे प्रधान मुख्य आयुक्त आलोक कुमार यांच्या हस्ते नव्याने समाविष्ट झालेल्या खेळाडूंना औपचारिकपणे नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

97 रिक्त पदांसाठी 07.01.2026 रोजीच्या अधिसूचनेद्वारे अर्ज मागवण्यात आले होते. या भर्तीसाठी विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंकडून 3,595 अर्ज प्राप्त झाले होते. विहित निकषांनुसार कठोर छाननी आणि मूल्यांकनानंतर गुणवत्तेच्या आधारावर 97 उमेदवारांची निवड करण्यात आली.

या भर्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या 80 टक्क्यांहून अधिक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. यावरून विभागात दाखल होणाऱ्या खेळाडूंच्या असामान्य गुणवत्तेची प्रचिती येते.

उल्लेखनीय नवनियुक्त खेळाडूंमध्ये  मुंबई रणजी क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि भारतीय कसोटी संघाचा भाग राहिलेला तनुष कोटियन, अहमदाबाद येथे आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा-2026 मध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारा अभिषेक, भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू तेजल हसबनीस, तसेच जागतिक नेमबाजी दिव्यांग क्रीडा विश्वचषक, नवी दिल्ली-2024 मध्ये सांघिक सुवर्णपदक आणि जागतिक नेमबाजी दिव्यांग क्रीडा विश्वचषक, अल ऐन, दुबई-2025 मध्ये सुवर्णपदक जिंकणारा दिव्यांग खेळाडू आकाश यांचा समावेश आहे.

ही भर्ती आयकर विभागात क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला चालना देण्यासोबतच नामांकित खेळाडूंना देशसेवेची संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. या प्रसंगी बोलताना, आयकर मुंबईचे प्रधान मुख्य आयुक्त आलोक कुमार यांनी नव्याने समाविष्ट झालेल्या खेळाडूंना त्यांचा क्रीडा सराव आणि स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी सर्व संधी मिळतील असे आश्वासन दिले. तसेच, नव्याने समाविष्ट झालेले खेळाडू आपल्या क्रीडा कारकिर्दीत ज्या शिस्त, जिद्द आणि उत्कृष्टतेचे प्रदर्शन करत आले आहेत, त्याच गुणांची प्रचिती सार्वजनिक सेवेतही देतील, अशी अपेक्षा आयकर विभाग मुंबईला आहे,” असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून, नव्याने भर्ती झालेल्या खेळाडूंना त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि लागू होणाऱ्या सरकारी नियमांची माहिती देण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रेलवन ॲप डाउनलोडने गाठला 4.76 कोटीचा टप्पा, दररोज सरासरी 10 लाख तिकिटांचे होते बुकिंग

नवी दिल्‍ली- आरक्षित तसेच अनारक्षित तिकिटांची डिजिटल पद्धतीने खरेदी केले...

कौशल्याधारीत शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा; चंद्रकांत पाटील यांचे शिक्षण संस्थांना आवाहन

पुणे सध्याच्या काळात कौशल्य विकासाला अत्यंत महत्त्व असून ग्रामीण...

दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी नितीन केंजळे

पुणे महापालिकेतील ३३ वर्षांच्या प्रशासकीय अनुभवाची दखल; दोन वर्षांसाठी...