नंदुरबार बाल लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास व्यापक करावा:डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

पीडित मुलांची गोपनीयता, सुरक्षित समुपदेशन आणि विशेष व्हॉट्सॲप क्रमांकाची व्यवस्था करावी –

पुणे, दि. ८ : नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलांशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे एका २२ वर्षीय युवकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनेक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय असल्याने तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण गुन्हेगारी साखळीचा शोध घ्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या, विधानपरिषद सदस्या आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

पीडित मुले अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख, छायाचित्रे, शाळा किंवा इतर वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवावी. त्यांचे जबाब पोक्सो कायद्यानुसार बालस्नेही वातावरणात, प्रशिक्षित समुपदेशकांच्या उपस्थितीत नोंदवावेत आणि आवश्यक असल्यास सुरक्षित वाहतुकीचीही व्यवस्था करावी, असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

मोबाईल, व्हिडिओ, छायाचित्रे आणि अन्य डिजिटल पुराव्यांची सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सखोल तपासणी करून इतर पीडित, आरोपी, मध्यस्थ किंवा सूत्रधारांचा शोध घ्यावा. तसेच सन २०२२ ते २०२६ या कालावधीत अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत का, याचाही तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

या प्रकरणासंदर्भात माहिती देण्यासाठी नंदुरबार पोलिसांनी स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करावा, ज्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिक गोपनीयपणे माहिती देऊ शकतील. माहिती देणाऱ्याची व पीडितांची ओळख पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याबाबत पोलिसांनी जनतेला विश्वास द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

अनेक वर्षे भीती आणि मानसिक त्रास सहन करणाऱ्या पीडित मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास निष्पक्ष, संवेदनशील आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावा. तसेच पीडितांना कायदेशीर मदतीबरोबरच सातत्यपूर्ण मानसोपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आता ‘मद्या’वरही ‘एफडीए’चे लक्ष:तुकाराम मुंढे यांचा इशारा

खानपानाच्या गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही पुणे- 'खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि...

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेतील तीन भव्य क्रीडा संकुलांची पुण्यातील अमनोरा...