परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बसविरुद्ध पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष तपासणी मोहीम

Date:

२१ दिवसांत ६६ वाहनांवर कारवाई; १३ लाख ७४ हजार रुपयांचा दंड आकारला, १० लाख ५६ हजार रुपयांची वसुली

पुणे, दि. २२ : परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बस महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करताना नियमांचे पालन करतात किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोषी आढळलेल्या ६६ लक्झरी बसवर मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

१ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेत परराज्यात नोंदणीकृत लक्झरी बसची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अग्निशामक यंत्र नसणे, जादा प्रवासी वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र संपलेले असणे, उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (HSRP) नसणे, परवाना नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, मालाची वाहतूक करणे, अनुज्ञप्ती नसणे तसेच वाहनात अवैध बदल करणे आदी नियमभंग आढळून आले.

या कारवाईत १३ लाख ७४ हजार ३७० रुपये दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी १० लाख ५६ हजार ८७० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.

या विशेष तपासणी मोहिमेत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी सहभाग घेतला. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व लक्झरी बसच्या चालक व मालकांनी वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत, वैध परवाना व योग्यता प्रमाणपत्र बाळगावे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.
००००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी:ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश

मुंबई-धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी व वायू...

बनावट सिमकार्ड आणि IMEI छेडछाडीपासून सावध राहण्याचे दूरसंचार विभाग, मुंबईचे आवाहन

गैरवापर केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹50 लाखांपर्यंत दंड‘संचार...

जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा

पुणे, दि. २२: दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर...

पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

२९ सप्टेंबरला अधिसूचना; ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता...