बनावट सिमकार्ड आणि IMEI छेडछाडीपासून सावध राहण्याचे दूरसंचार विभाग, मुंबईचे आवाहन

Date:


गैरवापर केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹50 लाखांपर्यंत दंड

‘संचार साथी’ पोर्टल व ॲपद्वारे मोबाईल कनेक्शन आणि हँडसेटची पडताळणी करण्याचे आवाहन

मुंबई, 22 सप्टेंबर 2026

दूरसंचार विभाग, मुंबईने नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवणे, सिमकार्डचा गैरवापर करणे, दूरसंचार ओळख क्रमांकांमध्ये अनधिकृत बदल करणे तसेच मोबाईल हँडसेटच्या IMEI क्रमांकात छेडछाड करण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. दूरसंचार अधिनियम, 2023 अंतर्गत अशा गैरप्रकारांसाठी 3 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹50 लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये एका PoS एजंटने नागरिकांच्या ओळखपत्रांचा त्यांच्या संमतीशिवाय वापर करून 25 मोबाईल कनेक्शन्स बेकायदेशीररीत्या सक्रिय केल्याचे आढळून आले. संबंधित एजंटला ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून, संशयास्पद क्रमांकांची पुनर्पडताळणी करून आवश्यकतेनुसार ते निष्क्रिय करण्यात आले आहेत.

नागरिकांनी या बाबी टाळाव्यात

  • आपल्या नावावर जारी केलेले सिमकार्ड इतरांना देऊ किंवा हस्तांतरित करू नये.
  • बनावट कागदपत्रे किंवा दुसऱ्याची ओळख वापरून सिमकार्ड मिळवू नये.
  • छेडछाड केलेले IMEI असलेली उपकरणे किंवा बदल करता येणारे SIM Box वापरू नयेत.
  • Calling Line Identity (CLI) किंवा इतर दूरसंचार ओळख क्रमांकांमध्ये अनधिकृत बदल करू नये.
  • सायबर फसवणूक किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांसाठी सिमकार्ड उधार देऊ किंवा भाड्याने देऊ नये.

‘संचार साथी’द्वारे करा पडताळणी

नागरिक ‘संचार साथी’ पोर्टल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून त्यांच्या नावावर जारी करण्यात आलेली सर्व मोबाईल कनेक्शन्स तपासू शकतात तसेच आवश्यक नसलेली किंवा त्यांच्या परवानगीशिवाय जारी करण्यात आलेली कनेक्शन्सची माहिती देऊन ती ब्लॉक करू शकतात. या प्लॅटफॉर्मवर हँडसेटच्या IMEI क्रमांकाची सत्यता पडताळण्याची सुविधाही उपलब्ध असून, त्याद्वारे मोबाईलचा ब्रँड, मॉडेल आणि उत्पादक यांसारखी माहिती तपासता येते.

दूरसंचार विभाग, मुंबईने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या सिमकार्ड आणि IMEI क्रमांकाकडे डिजिटल ओळखीचे महत्त्वाचे घटक म्हणून पाहावे, त्यांची नियमितपणे पडताळणी करावी, ते सुरक्षित ठेवावेत आणि दूरसंचार सेवांचा वापर केवळ कायदेशीर चौकटीतच करावा. नागरिकांनी आपल्या ओळखपत्रांचा गैरवापर होणार नाही याबाबत सतर्क राहावे तसेच कोणतेही संशयास्पद किंवा अनधिकृत मोबाईल कनेक्शन आढळल्यास त्याची तात्काळ दूरसंचार सेवा प्रदात्याकडे किंवा संबंधित कायदा अंमलबजावणी यंत्रणेकडे माहिती द्यावी.

‘संचार साथी’ पोर्टल येथे उपलब्ध आहे – www.sancharsaathi.gov.in

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी:ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश

मुंबई-धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनी व वायू...

जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा

पुणे, दि. २२: दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर...

पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

२९ सप्टेंबरला अधिसूचना; ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता...