E20 पेट्रोल मधील पाण्याचे अभिसरण आणि क्लोराइडचे अस्तित्वासंबंधी तेल विपणन कंपन्यांनी केल्या चाचण्या

Date:

पेट्रोलमध्ये प्रति क्लोराइड आणि पाण्याचे प्रमाण एक दशलक्ष भागापैकी (ppm) 500 भाग इतके असल्याचे दावे फोल

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2026

इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये (EBMS – E20 Petrol) पाणी आणि क्लोराइड आढळत असल्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये अलीकडे प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर, तेल विपणन कंपन्यांनी, संपूर्ण देशभरातील इ-20 पेट्रोल पुरवठा साखळीची अतिरिक्त सखोल तपासणी केली आहे. इंधनाची गुणवत्ता सातत्याने विहित मर्यादेत असल्याची बाब या तपासणीच्या निष्कर्षांमधून पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. यासंबंधी केलेल्या चाचण्यांची आखणी ही शास्त्रोक्त पद्धतीने केली गेली होती. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात पूर्वनिर्धारीत नसलेल्या आकस्मिक स्वरुपात चाचण्या केल्या गेल्या. इंधनात भेसळ होऊन त्याची गुणवत्ता बिघडल्याचा संकेत देणारी कोणतीही बाब या चाचण्यांमध्ये आढळून आली नाही.

आपण इंधनाच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे तसेच, वाहनाच्या कामगिरीवर किंवा ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही समस्येचे वैज्ञानिक तपासणी आणि योग्य कारवाईच्या आधारे त्वरित निवारण केले जाईल याबाबतही तेल विपणन कंपन्यांनी आपल्या सर्व ग्राहकांना आश्वस्त केले आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी क्लोराइड संबंधी अत्यंत कठोर मानके निश्चित केली आहेत. संपूर्ण पुरवठा साखळी अंतर्गत या मानकांचे पालन होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी सातत्याने वारंवार देखरेख करणारी यंत्रणाही प्रस्थापित केली आहे. त्यानुसार देशभरातील शुद्धीकरण कारखाने, अर्कनिर्मिती केंद्र (डिस्टिलरीज), आगार / वितरण केंद्र आणि किरकोळ विक्री केंद्रांसह पुरवठा साखळीअंतर्गतच्या विविध टप्प्यांवर क्लोराइडची तपासणी केली जात आहे. या उपाययोजना म्हणजेच संपूर्ण पुरवठा साखळी अंतर्गत गुणवत्तेमधील सातत्यता राखली जात असल्याची हमीच आहे.

देशात याआधीपासूनच गुणवत्ता आश्वासन नियमावली (quality assurance protocols) लागू आहे. यासोबतच तेल विपणन कंपन्यांद्वारे प्रत्येक किरकोळ विक्री केंद्रावर दररोज 8 ते 12 वेळा पाण्याचे अभिसरण (वॉटर-इंग्रेस) आणि घनते संबंधीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. या माध्यमातून या कंपन्यांनी देखील स्वतःची देखरेखविषयक व्यवस्था अधिक भक्कम केली आहे. विविध ठिकाणी फिरत्या इंधन गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. गुणवत्ता आश्वासनाचा सर्वोच्च दर्जा राखला जाईल याची सुनिश्चित करण्यासाठी इंधन प्रयोगशाळांच्या माध्यमातून चाचणी निकालांची स्वतंत्रपणे पडताळणी देखील केली जात आहे.

पुरवठा साखळीअंतर्गत चाचणीसंबंधीच्या या बहुस्तरीय आणि विस्तारलेल्या नियमावलीमुळे आपल्या इंधनाचा दर्जा सर्वोच्च असल्याचेच सिद्ध झाले आहे.

1. तेल शुद्धीकरण कारखान्यातून येणारे पेट्रोल (MS): पेट्रोलमधील प्रत्यक्ष क्लोराइडचे प्रमाण हे प्रति एक दशलक्ष भागामधील (PPM) 1 भाग या मर्यादेच्या आतच आहे

विविध तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून पूर्वनिर्धारीत नसलेल्या आकस्मिक स्वरुपात निवडलेल्या पेट्रोलच्या 100 पेक्षा जास्त अतिरिक्त नमुन्यांच्या चाचण्या केल्या गेल्या आहेत. क्लोराइडचे प्रमाण सातत्याने कमी म्हणजेच सर्व नमुन्यांमध्ये प्रति एक दशलक्ष भागामधील (PPM) 1 भाग या मर्यादेत किंवा त्याहून कमीच नोंदवले गेले असल्याचे या चाचण्यांमधून दिसून आले आहे. देशातील शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रिया अत्यंत भक्कम असून, या व्यवस्थेअंतर्गत राबविलेल्या गुणवत्ता चाचण्या सातत्याने परिणामकारक ठरत असल्याची प्रचितीच निष्कर्षांतून आली आहे.

2. अर्कनिर्मिती केंद्रांतून (डिस्टिलरीज) येणारे शुद्ध इथेनॉल:

इथेनॉल हा पेट्रोलमध्ये केल्या जाणाऱ्या मिश्रणातील एक मुख्य घटक आहे. अर्कनिर्मिती केंद्रांकडून पुरवल्या जाणाऱ्या इथेनॉल मधील क्लोराइडचे प्रमाणही विहित मानकांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी नोंदवले गेले आहे. देशात उत्पादन आणि शुद्धीकरणाच्या टप्प्यावरही भक्कम गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा असल्याचेच या निष्कर्षांवरून दिसून येते.

तेल विपणन कंपन्या आणि उच्च तंत्रज्ञान केंद्राच्या (CHT) सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष कृती दलाने गेल्या 10 दिवसांत देशातील 80 अर्कनिर्मिती केंद्रांमधील इथेनॉलच्या नमुन्यांची तपासणी केली असून, सर्व नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण प्रति एक दशलक्ष भागामधील (PPM) 3 भागांपेक्षा कमी आढळले आहे.

3. तेल विपणन कंपन्यांच्या विपणन पायाभूत सुविधांद्वारे वितरित केले जाणारे इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20):

इंधनांचे आगार / इंधन वाहक टँकर : इंधनांचे आगार आणि वितरण केंद्रांवरही इथेनॉल आणि इ-20 पेट्रोलच्या नमुन्यांची तपासणी केली गेली. या तपासणीतही क्लोराइडचे प्रमाण हे विहित  मर्यादेत असल्याचेच दिसून आले आहे. देशभरात विस्तारलेल्या इंधन साठवणूक आणि वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वत्र इंधन वाहून नेले जात असतानाच्या टप्प्यावरही इंधनाची गुणवत्ता राखण्यासाठी नियमित देखरेख ठेवली जात आहे. या चाचण्या अंतर्गत देशभरातील विविध तेल विपणन कंपन्यांच्या वितरण केंद्रांवरून 80 पेक्षा जास्त नमुने संकलित केले होते. या सर्व नमून्यांमध्येदेखील क्लोराइडचे प्रमाण प्रति एक दशलक्ष भागामधील (PPM) 3 भागांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे.

किरकोळ विक्री केंद्र (Retail Outlets): देशभरातील किरकोळ विक्री केंद्रांवर देखील क्लोराईडचे प्रमाण तपासण्यासाठी 1000 पेक्षा जास्त नमुन्यांचा कठोर चाचणी कार्यक्रम राबवला गेला. या तपासण्यांपैकी आत्तापर्यंत गेल्या काही दिवसांमध्ये 160 चाचण्यांच्या अहवालांचे विश्लेषण करण्यात आले आहे. क्लोराइडचे प्रमाण प्रति एक दशलक्ष भागांमध्ये 1000 पेक्षा जास्त भाग असेल असा दावा केला जात होता. मात्र या तपासलेल्या अहवालांमध्ये क्लोराईटचे प्रत्यक्ष प्रमाण हे प्रति एक दशलक्ष भागामधील 0 ते 3 च्या दरम्यानच आढळले आहे. या तपासणी करणाऱ्या यंत्रणेला केवळ चार प्रकरणांमध्येच क्लोराइडचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले. अशा सर्व ठिकाणची इंधन विक्री देखील तत्काळ थांबण्यात आली. यासोबतच क्लोराईडचे प्रमाण वाढण्यामागच्या कारणांचे सखोल विश्लेषण करून योग्य त्या सुधारणात्मक उपाययोजना लागू केल्यानंतरच तिथे पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

4. पाण्याच्या अभिसरणासंबंधीची चाचणी (Water ingress testing):

देशभरातील सुमारे 90,000 किरकोळ विक्री केंद्रांनी त्यांच्या भूगर्भातील साठवण टाक्यांची पाण्याच्या अभिसरणासंबंधीची अनिवार्य तपासणी आणि देखरेख सुरू केली आहे. या भूगर्भातील टाक्यांची दररोज 8 ते 12 वेळा तपासणी केली जात असून आतापर्यंत कुठेही पाण्याचे अभिसरण घडून आल्याचे आढलेले नाही.

वर नमूद केल्लाया या सर्व चाचण्यांचा तक्ता स्वरूपातील सारांश उच्च तंत्रज्ञान केंद्राच्या (CHT) www.cht.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जसजसे अधिकाधिक चाचण्यांचे निकाल उपलब्ध होतील तसतसे ही माहिती अद्ययावत केली जाणार आहे.

इंधनाची गुणवत्तेला आपण सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेवले असल्याची हमी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना दिली आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण पुरवठा साखळीतील गुणवत्तेची सातत्याने तपासणी केली जात असून, जिथे कुठे काही त्रुटी आढळतात, तिथे तत्काळ आणि कठोर सुधारणात्मक कारवाई केली जात आहे.

इथे नमूद केलेली सर्व परिस्थिती लक्षात घेऊन, ग्राहकांनी पूर्ण विश्वासाने इ-20 पेट्रोलचा वापर सुरू ठेवावा असे आवाहनही या कंपन्यांनी केले आहे. तेल विपणन कंपन्यांच्या व्यवस्थेअंतर्गत  पुरवले जाणारे इंधन हे विहित गुणवत्ता मानकांनुसारच आहे. तसेच पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भक्कम गुणवत्ता आश्वासन आणि देखरेख व्यवस्थेचे पाठबळही यासाठी उपलब्ध करून दिले असल्याचे या कंपन्यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेतील तीन भव्य क्रीडा संकुलांची पुण्यातील अमनोरा...

नाटक समाजाचा आरसा – प्रा. गणेश चंदनशिवे

मुक्त विद्यापीठात माजी विद्यार्थी मेळावा - सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न नाशिक...

राष्ट्र सेवा दलाचे महात्मा फुले विचार संमेलन नोव्हेंबरमध्ये पुण्यात 

२७,२८,२९ नोव्हेंबर दरम्यान  तीन दिवसांचा विचार, साहित्य, संस्कृती महोत्सव  पुणे : राष्ट्र सेवा...