राष्ट्र सेवा दलाचे महात्मा फुले विचार संमेलन नोव्हेंबरमध्ये पुण्यात 

Date:

२७,२८,२९ नोव्हेंबर दरम्यान  तीन दिवसांचा विचार, साहित्य, संस्कृती महोत्सव 

पुणे :

राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील महात्मा फुले विचार साहित्य संमेलन पुण्यात दि .२७,२८,२९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.या संमेलनात देशभरातील  विचारक,भाष्यकार, अभ्यासक,संशोधक,लेखक,कवी,संपादक,पत्रकार,प्राध्यापक,कलाकार,कृतीवंत,जेन झी आंदोलनातील देशभरातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी यांचा सहभाग असेल.राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

महात्मा फुले जन्म द्विशताब्दी, महाड चवदार तळ्याची शताब्दी, मनुस्मृती दहन शताब्दी आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाची १२५ वर्षे या निमित्ताने राष्ट्र सेवा दल वर्षभर विषमता निर्मूलन निर्धार वर्षे देशभर साजरे करत आहे. त्याचा भाग म्हणून हे विचार,साहित्य, संस्कृती संमेलन होत आहे.

 संमेलनात पुस्तक प्रदर्शन,जेन झी आंदोलनातील तरुणांच्या पोस्टरचे प्रदर्शन,तरुण व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे लाईव्ह प्रदर्शन,संविधान  दालन,विविध विषयांवर टॉक शो, मुलाखती,व्याख्याने,नाटक,गाणी, कविता सादर होतील.लेखक,कवी आपल्या भेटीला हा विशेष उपक्रम प्रकाशकांच्या पुस्तक दालनात लक्ष वेधून घेईल.


या संमेलनासाठी संमेलन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, राजन गवस, प्रवीण बांदेकर, नीरज हातेकर, अलीम वकील,  अरुण म्हात्रे,  ज्ञानेश महाराव, निशिकांत कोलगे, आशालता कांबळे, विनोद शिरसाठ, लक्ष्मण यादव, हुबनाथ पांडे, प्रकाश दुबे, प्रदीप दाते, किशोर ढमाले, सुबोध मोरे, प्रतिमा परदेशी, सोमनाथ रोडे, सरफराज अहमद, सूरज येंगडे,जयवंत पाटील, अजित शिंदे ,राजा कांदळकर तर विशेष निमंत्रित म्हणून कपिल पाटील, सुभाष वारे, अंजली आंबेडकर, अभिजित वैद्य, नितीन वैद्य यांचा समावेश आहे.पुण्यातील संमेलन स्थळाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

 हे संमेलन कसे असावे याबद्दल काही सूचना असल्यास पुढील  मोबाईल नंबरवर व्हॉट्स अप करून कळवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.संमेलनात सहभाग नोंदवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी रोहित ढाले 9869819878, सागर भालेराव 9967055630, प्रशांत इंगळे 9420889862, अभिजित आंब्रे 8605400373 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आता ‘मद्या’वरही ‘एफडीए’चे लक्ष:तुकाराम मुंढे यांचा इशारा

खानपानाच्या गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही पुणे- 'खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि...

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेतील तीन भव्य क्रीडा संकुलांची पुण्यातील अमनोरा...