ऑनर किलिंग-दुहेरी हत्याकांडाच्या तपासाचा गौरव; पुण्याचे डीसीपी ऋषिकेश रावले यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

Date:

१३ आरोपी निष्पन्न; पाच आरोपींना जन्मठेप, सदानंद दाते यांच्या हस्ते सन्मान

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश प्रदीप रावले यांना उल्लेखनीय गुन्हे अन्वेषणासाठी ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण)’ प्रदान करण्यात आले. पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात शनिवारी झालेल्या विशेष समारंभात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

रावले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ऑनर किलिंग आणि दुहेरी हत्याकांडाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या तपासाची केंद्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. या प्रकरणाच्या तपासावेळी सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, एसडीआर, डम्प डेटा, डीएनए, बॅलेस्टिक अहवाल आणि इतर वैज्ञानिक पुराव्यांचा प्रभावी वापर करण्यात आला.

तपासादरम्यान सुरुवातीला दिसत असलेल्या घटनेमागे आणखी व्यक्तींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. रावले यांच्या तपास पथकाने सखोल तांत्रिक आणि वैज्ञानिक तपास करून एकूण १३ आरोपी निष्पन्न करत त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयात सक्षम दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणात न्यायालयाने पाच आरोपींना जन्मठेप, तर अन्य दोन आरोपींना प्रत्येकी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याची नोंद अधिकृत पुरस्कार अहवालात आहे. या उल्लेखनीय तपास कामगिरीमुळे डीसीपी ऋषिकेश रावले यांची केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकासाठी निवड करण्यात आली.

दरम्यान, सन २०२३ आणि २०२४ साठी महाराष्ट्रातील एकूण २२ पोलिस अधिकाऱ्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये २ पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, ९ पोलीस निरीक्षक, ६ सहायक पोलीस निरीक्षक आणि १ पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांनी खून, दरोडे, खंडणी, अपहरण, सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि क्रिप्टोकरन्सीशी संबंधित विविध गंभीर प्रकरणांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक तपास पद्धतींचा प्रभावी वापर केला आहे. समारंभाला पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आता ‘मद्या’वरही ‘एफडीए’चे लक्ष:तुकाराम मुंढे यांचा इशारा

खानपानाच्या गुणवत्तेत तडजोड खपवून घेणार नाही पुणे- 'खाद्यपदार्थांप्रमाणेच मद्य आणि...

देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे : सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

खामगावातील पारधी-आदिवासी आश्रमशाळेतील तीन भव्य क्रीडा संकुलांची पुण्यातील अमनोरा...