भारतीय हवाई दल आणि जपान यांच्या संयुक्त हवाई संरक्षण सराव -‘एक्सरसाइज वीर गार्डियन 2026’ ची सांगता

Date:

नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

भारतीय हवाई दल आणि जपानच्या एअर सेल्फ-डिफेन्स फोर्स (JASDF) यांच्यातील ‘वीर गार्डियन 2026’ हा द्विपक्षीय हवाई सराव 22 सप्टेंबर 2026 रोजी जोधपुरमध्ये संपन्न झाला. उभय देशांच्या  हवाई दलांमधील आंतरकार्यक्षमता आणि धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी हा हवाई सराव खूपच उपयुक्त ठरला. भारतीय  हवाई दलाच्या विविध प्रकारच्या विमानांनी या हवाई सरावात सहभाग घेतला. यात, Su-30 MKI, राफेल, तसेच  स्वदेशी बनावटीच्या ‘लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (LCA) ‘तेजस’ यांसारख्या विविध प्रकारच्या विमानांचा समावेश होता, तर जपानच्या  हवाई दलाने (JASDF) F-2A या लढाऊ विमानांसह यात सहभाग घेतला.

14 दिवसांच्या संयुक्त हवाई सरावा दरम्यान, IAF आणि JASDF यांनी थेट नजरेस पडणाऱ्या अंतरावरील हवाई युद्ध (visual range combat) आणि अनेक विमानांच्या एकत्रित आणि सुनियोजित मोहिमा यांसारख्या विविध आधुनिक उड्डाण मोहिमांमध्ये सहभाग घेतला. विशेष अतिथि दिनाच्या दिवशी जपानच्या  हवाई दलाचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता आणि भारतीय  हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी जोधपूर हवाई दल तळाला भेट देऊन स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या  लढाऊ विमानातून उड्डाण केले.

या सरावादरम्यान भारतीय  हवाई दल आणि जपान हवाई संरक्षण दलाच्या  (JASDF) अधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यात, विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञांचे आदान-प्रदान, कार्यपद्धतीवरील चर्चा, मोहिमांचे नियोजन करण्यासंदर्भात परिषदा, अभियांत्रिकी विषयातील परस्परसंवाद, देखभाल सराव आणि एरोस्पेस सुरक्षा माहिती सत्रांचा समावेश होता,ज्यामध्ये उभयपक्षी विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. यामुळे सहभागी तुकड्यांना एकमेकांच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींबद्दल महत्वाची माहिती मिळवणे आणि एकमेकांच्या अद्वितीय क्षमतांमधून शिकणे शक्य झाले.

‘वीर गार्डियन 26’ हा हवाई सराव हा दोन्ही  हवाई दलांमधील शाश्वत मैत्री आणि परस्पर सहकार्य  आणि आपलेपणाचे द्योतक ठरला आहे. या उपक्रमामुळे भारत आणि जपान यांच्यातील संरक्षण भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यातील धोरणात्मक व्याप्ती  वाढवण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची व्याप्ती आता देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटक स्थळांपर्यंत

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व राज्यांना पुढील राष्ट्रीय...

जमुई प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पायात पोलिसांची गोळी; सहा जण ताब्यात

अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण; पोलिसांच्या...

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा सुवर्णझेंडा; श्रीलंकेचा 147 धावांनी धुव्वा

सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक; स्मृती मंधानाची 79 धावांची दमदार खेळी,...