राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची व्याप्ती आता देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटक स्थळांपर्यंत

Date:

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व राज्यांना पुढील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी उत्तम पर्यटन स्थळांचा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आता बंदिस्त सभागृहांपुरते मर्यादित न राहता लोकांपर्यंत पोहोचतील: अश्विनी वैष्णव

नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार राष्ट्रीय कार्यक्रमांना पारंपरिक स्थळांपुरते मर्यादित स्वरुप बहाल न करता त्यांना देशातील विविध स्थळांशी जोडण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आता देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपर्यंत नेले जातील असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनुसार आम्ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपर्यंत नेणार आहोत.

एकता नगर ला जगभरात ओळख प्राप्त झाली असून तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा असल्याने हे स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे, असे ते म्हणाले. ज्यावेळी राष्ट्रपती आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिथयश मान्यवर इतक्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देतील, त्यावेळी अधिक लोकांना त्याविषयी आणि तेथील अनुभवाविषयी माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना सभागृहापुरते सीमित न ठेवता त्यांना नागरिकांच्या अधिक समीप नेतानाच पर्यटनाच्या माध्यमातून त्यांचा प्रचार आणि विकास करण्याचा प्रयत्न आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.

सर्व राज्यांनी आपापल्या राज्यातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांना ओळखून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या आयोजनासाठी तसा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन अश्विनी वैष्णव यांनी केले. या प्रस्तावामध्ये तिथे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सुविधा आणि त्या पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा यांचा समावेश असावा, असे ते म्हणाले. ज्या राज्याचा प्रस्ताव स्वीकारला जाईल, त्या राज्यातील प्रस्तावित पर्यटन स्थळी पुढील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ट्वेन्टी परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी देशातील विविध भागांमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये उपक्रम आयोजित करण्यात आले होते, याचे स्मरण त्यांनी करुन दिले. त्याचप्रमाणे चित्रपट उद्योग आणि पर्यटन यांची सांगड कशाप्रकारे घालता येईल या वैचारिक प्रक्रियेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी आयोजित केले जातील.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, चित्रपट आणि पर्यटन यांना एकत्र आणल्याने पर्यटनस्थळांना फायदा होईल, तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांना केवळ सभागृह पुरते मर्यादित न राहता देशभरातील प्रत्यक्ष पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा : अनंत नाग यांना दादासाहेब फाळके; ममूटी-कार्तिक सर्वोत्कृष्ट अभिनेता

‘आर्टिकल 370’ सर्वोत्कृष्ट चित्रपट; यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘घरात...

जमुई प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पायात पोलिसांची गोळी; सहा जण ताब्यात

अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण; पोलिसांच्या...