एमआयटीडब्ल्यूपीयू मध्ये ‘शुभारंभ २०२६’ कार्यक्रमास पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती
पुणे, ७ ऑगस्ट:“विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्याआहारी न जाता त्याचा विधायक व सकारात्मक कामांसाठी वापर करावा. आवेशपूर्ण संदेशांची देवाणघेवाण टाळून ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नेहमी सजग राहावे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर काय सर्च करतो, काय फॉरवर्ड करतो याचे भान सतत ठेवावे. इंटरनेट वापरण्याचे जसे लाभ आहेत तसेच, तोटेही मोठ्याप्रमाणात आहेत,” असे विचार पुणे पोलिस सह आयुक्त संजय दराडे यांनी व्यक्त केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक वर्ष२०२६-२७ च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यातआलेल्या ‘शुभारंभ’ या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना सोशल मीडिया वापरताना कशीसावधगिरी बाळगावी व इंटरनेट वापरताना काय काळजी घ्यावी या विषयावर बोलत होते.हा कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्षडॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी पुणे पोलिस विभागातील अतिरिक्त पोलिसआयुक्त तेजस्वी सातपुते, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. दत्ता दंडगे आणि कुलसचिव प्रा. गणेश पोकळे उपस्थित होते.
संजय दराडे म्हणाले:“सायबर फसवणुकीत डिजिटल अरेस्ट, ट्राय फोन स्कॅम, पार्सल स्कॅम, सेक्सटॉर्शन, टास्क किंवा पार्ट टाईम जॉब फ्रॉड, ट्रेडिंग फ्रॉड, लोन अॅप फ्रॉड आणि डेटिंग फ्रॉड सारख्या फसवणूकीपासून सावध राहावे. तसेच, विद्यार्थ्यांनी मादक पदार्थांचे सेवन म्हणजे नार्कोटिक्स पासून स्वतःचा सांभाळ करावा.”
डॉ. दत्ता दंडगे म्हणाले:“अध्यात्म आणि विज्ञानयांचा मेळ घालून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षणाचे धडे दिले जातात.येथे सर्वधर्म समभाव आणि मानवतेचे बीज पेरले जाते. बदलते जग, कृत्रिम बुद्धिमत्ता, वाढता हिंसाचार यांसारख्या अनेक गोष्टींचासामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते. मूल्य,संस्कार आणि स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कडून सर्वतोपरी मदत केली जाते.”
प्रा. गणेश पोकळे म्हणाले:“ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातूनचालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच, विद्यार्थीजीवनात अध्ययन अत्यंत महत्त्वाचे असून त्यावरच लक्ष केंद्रित करण्याचा सल्लादिला.”
सर्वांगीण विकास आणि जबाबदार नागरिकत्वमहत्त्वाचे
पुणे पोलिस विभागातील अतिरिक्त पोलिस आयुक्ततेजस्वी सातपुते म्हणाल्या, “सर्वांगीण विकासातूनच यश मिळते. शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होण्याबरोबरच भावनिकदृष्ट्या खंबीर आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदारही बनावे.संस्कार, नैतिक मूल्ये, सचोटी, सहानुभूती आणि भावनिक बुद्धिमत्ता यातून जबाबदार आणि दयाळू व्यक्तींची ओळख होते. सध्याची पिढी बुद्धिमान आणि सक्षम आहे.परंतु त्यांच्यामध्ये तणाव, चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.प्रत्येकाला मूलभूत हक्क असला तरी त्याचा वापर नेहमी जबाबदारीने करावा. इतरांच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे कधीही उल्लंघन करू नये. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करताना समाजासाठी सकारात्मकयोगदान देणारे, जबाबदार, सामाजिक जाणीव असलेले, कायद्याचे पालन करणारे आणि नैतिक नागरिक बनण्यासाठीप्रोत्साहित होणे गरजेचे आहे.” कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

