पुणे,दि.७ : जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांसाठी काम करणाऱ्या ३ नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण समितीमध्ये सदस्यपदी निवड करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. संस्थांनी त्यांचे अर्ज २० ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी केले आहे.
संस्थांनी अर्ज सादर करताना धर्मादाय आयुक्त यांनी प्रदान केलेले नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे मागील ३ वर्षातील छायाचित्रांसह संक्षिप्त कार्यविवरण, मागील ३ वर्षाचे ऑडीट रिपोर्ट, संस्थेकडून नामनिर्देशन करण्यात येत असलेल्या प्रतिनिधीचे नाव, पद, त्याच्या कामाचा तपशिल व संबंधित कागदपत्रे इत्यादी
आवश्यक तपशिलांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
संस्थांचे परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन समिती, बी विंग, १ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे-१ येथे स्वीकारले जातील, असेही श्री. इंदलकर यांनी कळविले आहे.

