खडकवासला धरणसाखळी ९९.१५ टक्के भरली; गतवर्षापेक्षा ३.२६ टीएमसी अधिक पाणीसाठा

Date:

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे १०० टक्के; मुठा नदीतील विसर्ग सायंकाळी ६ वाजता ९,४१६ क्युसेक्सवर

पुणे, दि. २ ऑगस्ट : खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये एकूण २८.९० टीएमसी म्हणजेच ९९.१५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणसाखळीत २५.६४ टीएमसी म्हणजे ८७.९७ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा तब्बल ३.२६ टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीन धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, टेमघर धरणातील पाणीसाठा ९३.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ८३० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती.

खडकवासला धरणात १.९७ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात दिवसभरात २ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत ६६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात ३४० क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून आतापर्यंत एकूण ६.५५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

पानशेत धरणात १०.६५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात १९५ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. पानशेत धरणाच्या जलविद्युत गृहातून ६०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सांडव्यावरून सायंकाळी सहा वाजता सुरू असलेला ५,६४२ क्युसेक्स विसर्ग कमी करून १,७१३ क्युसेक्स करण्यात आला.

वरसगाव धरणात १२.८२ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात २७८ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळी पाच वाजता सांडव्यावरून ७,१९२ क्युसेक्स आणि जलविद्युत गृहातून ६०० क्युसेक्स विसर्ग सुरू होता.

टेमघर धरणात ३.४६ टीएमसी म्हणजे ९३.२८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात १७ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. धरण क्षेत्रात दिवसभरात २२ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत २,५७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत घट होत असल्याने मुठा नदीतील विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता २४,२७७ क्युसेक्स असलेला विसर्ग प्रथम १८,४१४ क्युसेक्स आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजता ९,४१६ क्युसेक्स करण्यात आला.

पावसाचे प्रमाण आणि धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रातील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 हाताने मैला साफ करणारी एकही व्यक्ती आढळली नसल्याची केंद्र सरकारची माहिती

मुंबई-हाताने मैला साफ करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करण्याबरोबरच सांडपाणी...

मित्रास सोडवण्यासाठी तरुणाचा पोलीस ठाण्यात धुडगूस

पुणे-सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या मित्राला सोडवण्यासाठी आलेल्या एका तरुणाने...

आर्थिक विवंचनेत होरपळ:एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या

पुणे -पुण्यातील पिंपरी येथील मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक...

“संत रोहिदास महाराज स्वातंत्र्य,समता व श्रमप्रतिष्ठेचे दीपस्तंभ- रवींद्र किरकोळे

पुणे-"संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांनी तत्कालीन विषम सामाजिक व्यवस्थेतील वेदनांना निराशेचे...