मित्रास सोडवण्यासाठी तरुणाचा पोलीस ठाण्यात धुडगूस

Date:

पुणे-सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या मित्राला सोडवण्यासाठी आलेल्या एका तरुणाने पोलिस ठाण्यातच धुडगूस घालत तोडफोड केली. पोलिसांना शिवीगाळ करत पोलिस ठाणे जाळून टाकण्याची, बॉम्बने उडवण्याची तसेच पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विनायक दत्तात्रय भोंडवे (२४, रा. चव्हाणनगर, धनकवडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कर्मचारी मारुती उत्तमराव नलवाड हे अटकेत असलेल्या शुभम भास्कर लोखंडे याच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. त्याच वेळी विनायक भोंडवे कोणतीही परवानगी न घेता थेट तपास कक्षात घुसला. त्याने पोलिसांकडे शुभम लोखंडे याला तात्काळ सोडून देण्याची मागणी केली. पोलिसांना जिवे मारण्याची धमकी इतर पोलिस शांत करण्यासाठी आले असता तो अधिक आक्रमक झाला. तपास कक्षाबाहेर ठेवलेली फायबरची खुर्ची लाथ मारून त्याने फोडली. या वेळी आरोपीने उपस्थित पोलिसांना जिवे मारण्याची धमकी दिली. “पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करीन, कोयत्याने वार करीन किंवा गोळी घालीन,’ अशी धमकीही दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासला धरणसाखळी ९९.१५ टक्के भरली; गतवर्षापेक्षा ३.२६ टीएमसी अधिक पाणीसाठा

खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे १०० टक्के; मुठा नदीतील...

आर्थिक विवंचनेत होरपळ:एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या

पुणे -पुण्यातील पिंपरी येथील मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये आर्थिक...

“संत रोहिदास महाराज स्वातंत्र्य,समता व श्रमप्रतिष्ठेचे दीपस्तंभ- रवींद्र किरकोळे

पुणे-"संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांनी तत्कालीन विषम सामाजिक व्यवस्थेतील वेदनांना निराशेचे...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्ष (आठवले) कडून अभिवादन

पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त...