आर्थिक विवंचनेत होरपळ:एकाच कुटुंबातील तिघांनी जीवनाचा केला शेवट

Date:

पुणे-मोरवाडी परिसरातील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा विषारी पदार्थामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विनोद पिल्ले (वय ५०), त्यांची पत्नी सिरजा पिल्ले (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले (वय १९) अशी मृतांची नावे आहेत. विनोद पिल्ले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गंभीर अवस्थेत आढळलेल्या सिरजा आणि पौर्णिमा यांना तातडीने पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी माय-लेकीचाही मृत्यू झाला.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पिल्ले कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी नेहरूनगर परिसरातील स्वतःचे घर विकले होते. त्यानंतर ते मोरवाडीतील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये भाड्याने राहत होते.

सिरजा पिल्ले या परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. त्या शाळेत न आल्याने सहकाऱ्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईक घरी पोहोचले असता दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले.

उच्चशिक्षित कुटुंबाच्या निर्णयाने धक्का

पिल्ले कुटुंब उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. विनोद पिल्ले हे एका खासगी कंपनीत कार्यरत होते. सिरजा या शाळेत नोकरी करत होत्या, तर पौर्णिमा पिंपरी-चिंचवडमधील एका महाविद्यालयात संगणकशास्त्राचे शिक्षण घेत होती. त्यामुळे कुटुंबाने उचललेल्या टोकाच्या पावलाने नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

घटनास्थळी चिठ्ठी आढळली

संत तुकारामनगर पोलिसांना घरातून एक चिठ्ठी आढळली आहे. त्यामध्ये आर्थिक विवंचना आणि कर्जाचा उल्लेख करण्यात आला असून, या घटनेसाठी अन्य कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळावरून काही वस्तू आणि नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि न्यायवैद्यक तपासणीनंतर मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. संत तुकारामनगर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेत ‘मंत्रा’च्या नावाच्या भेटवस्तूंचे वाटप- सामाजिक कार्यकर्ते संजय कोणे यांनी केला भांडाफोड

पुण्यात टेकड्यांची तोडफोड, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि उंच...

‘उद्या दुपारी मुंबईकडे निघणार; आझाद मैदानात जाण्यापासून कोण रोखतं ते बघतो’ — मनोज जरांगे

प्रकृती खालावल्याने सलाईन सुरू; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला,...