इनर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी १०८८ कोटींचा खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता

Date:

७.२३ लाख चौरस मीटर जमीन संपादित करणार ; आठ गावांतील जागांचा समावेश

पुणे :

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित इनर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी तब्बल १ हजार ८८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७ लाख २३ हजार १७६ चौरस मीटर क्षेत्र संपादित करावे लागणार असून, त्यासाठीचा संपूर्ण निधी पुणे महापालिकेलाच उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यापूर्वी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेण्याची शिफारस महापालिका प्रशासनाने केली होती. त्यानुसार समितीने मान्यता दिल्याचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

इनर रिंग रोड आणि एचसीएमआर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले होते. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दोन्ही प्रकल्पांसाठीचे भूसंपादन प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार इनर रिंग रोडसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

इनर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी वडाचीवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द आणि जांभूळवाडी या गावांतील जमीन संपादित करावी लागणार आहे. या क्षेत्राचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७ लाख २३ हजार १७६ चौ.मी. असून, त्यासाठी अंदाजे १ हजार ८८ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

नवीन भूसंपादन कायदा २०१३नुसार कलम १९ची अधिसूचना काढण्यापूर्वी ३० टक्के रक्कम जमा करावी लागते. मात्र, ही रक्कम तत्काळ जमा न करता अंतिम निवाड्याच्या वेळी संपूर्ण नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करताना महापालिकेवर तातडीने ३० टक्के रक्कम भरण्याचा भार येणार नसला, तरी अंतिम निवाड्याच्या वेळी मोठ्या निधीची तरतूद करावी लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार संबंधित संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारा खर्च उचलण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इनर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी लागणारी अंदाजे १,०८८.५० कोटी रुपयांची रक्कम पुणे महापालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

दरम्यान, संबंधित जमीन नवीन भूसंपादन कायदा २०१३नुसार सक्तीने तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम १२६नुसार तडजोडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रस्तावित आहे. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मान्यता घेणे योग्य ठरेल, अशी खात्याची शिफारस आहे.

एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आर्थिक भार महापालिकेवर पडणार आहे.एचसीएमटीआरसाठी सुमारे २,६३४ कोटी रुपये, तर इनर रिंग रोडसाठी १,०८८.५० कोटी रुपये अपेक्षित आहेत. त्यामुळे केवळ भूसंपादनासाठी या दोन प्रकल्पांवर मिळून सुमारे ३,७२२.५० कोटी रुपयांचा संभाव्य खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘उद्या दुपारी मुंबईकडे निघणार; आझाद मैदानात जाण्यापासून कोण रोखतं ते बघतो’ — मनोज जरांगे

प्रकृती खालावल्याने सलाईन सुरू; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला,...

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले पुण्यातील गणपतींचे दर्शन

पुण्यातील गणेशोत्सवात केली देशातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना पुणे-भारतीय जनता पक्षाचे...