विद्यार्थ्याच्या हितासाठी केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.

Date:

– पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

नीट पेपरफुटी संदर्भात केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दि. २२ जुलै रोजी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजभवन येथे काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फलक दाखवून मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आपले मनोगत व्‍यक्त करताना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी म्हणाल्या की, ‘‘ नवी दिल्ली येथे ज्येष्ठ पर्यावरणवादी शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षा पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुमारे तीन आठवडे शांततामय आंदोलान करणाऱ्या लाखो तरुण विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी या विद्यार्थ्यांवर केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने अश्रूधूर आणि लाठीहल्ला करून जी क्रूरता दाखवली त्याचा पुणे शहर कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार राज्यघटनेनुसार अधिकार दिला आहे. त्यानुसार अहिंसक मार्गाने नवी दिल्लीयेथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणे हे मोदी सरकारचे कर्तव्य होते. मात्र त्याऐवजी अकार्यशम शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी मोदी सरकारने राक्षशी पोलीस बळाचा वापर करून विद्यर्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. ही क्रौर्याची परिसीमा आहे. तरुणांच्या आक्रोक्षाला प्रतिसाद देऊन मोदी सरकार मधील अकार्यशम शिक्षण मंत्र्याला हाकलून देण्याऐवजी या तरुण विध्यार्थ्यांना जी अमानुष वागणूक दिली त्यामुळे अमानुष दडपशाहीची व क्रौर्याची परिसीमा गाठली गेली असे म्हणावे लागेल. देशातील तरुण आणि जनतेनेपासून नाळ तुटलेल्या भाजप सरकारची अकार्यक्षम, अपयशी आणि आता क्रूर ही प्रतिमा सर्वांसमोर येत आहे. देशाचे उद्याचे भविष्य असणाऱ्या कोट्यावधी तरुणांना चांगले शिक्षण, आरोग्य व रोजगार देण्याऐवजी आंदोलक तरुण विद्यार्थ्यांना झोडपून काढणाऱ्या क्रूरकर्म मोदी सरकारच्या तरुणांच्या विरोधी अशा कृतीला काँग्रेस पक्ष सैदेव विरोध करत राहील. आता जनतेने आणि विशेषतः तरुण विद्यार्थ्यांनी मोदी सरकारचा हा खरा चेहरा ओळखावा.’’

यानंतर पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ‘‘सरकार भ्रष्टमुक्त सरकार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. परंतु त्यांच्या कारकिर्दीमध्ये पेपरफूटी, राम मंदिरातील दानपेटीतून १४०० कोटी रूपये चोरीला जाणे हे या सरकारचे अपयश आहे. आपली चूक मान्य करून पंतप्रधानांनी त्वरीतच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. देशभरातील विद्यार्थी आपल्या न्यायासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करीत आहेत. भारतातील अनेक शहरामध्ये विद्यार्थांनी आंदोलन करून मोदी सरकारच्या विरूध्द आपला निषेध व्‍यक्त केला. मोदी सरकारने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अभय दिला. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. आपल्याला चांगले शिक्षण मिळून नीट सारख्या परिक्षेमध्ये उत्तीर्ण होवून चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. पंतप्रधान मोदींनी यांचे स्वप्न भंग केले आणि शांततेने निदर्शन करणाऱ्या विद्यार्थांवर पोलीसांमार्फत लाठी हल्ला केला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला पाहिजे.’’
या आंदोलनात नगरसेवक रफिक शेख, अविनाश साळवे, साहिल केदारी, विशाल मलके, अविनाश बागवे, अमीर शेख, मेहबुब नदाफ, भाऊसाहेब आजबे, सतिश पवार, जीवन चाकणकर, संजय मोरे, द. स. पोळेकर, दत्ता जाधव, ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव, रविंद्र माझीरे, राजू ठोंबरे, स्वप्निल नाईक, रोहित साळवी, कुणाल राजगुरू, राहुल वंजारी, हर्षद हांडे, विक्रम शहाणे, हेरॉल्ड मॅसी, अविनाश अडसूळ, वैभव डांगमाळी, देविदास लोणकर, विल्सन मॅसी, लता राजगुरू, नीता रजपूत, शिवानी माने, प्रियंका रणपिसे, सारिका मुंडावरे, सीमा सावंत, प्रियंका मधाळे, सुंदर ओव्‍हाळ, अभिजीत गोरे, अक्षय कांबळे, पवन खरात, सिध्दांत जांभुळकर, अनिकेत गावडे, कृष्णा साठे, सुष्मिता हरणे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठेकेदार आत्महत्या प्रकरण:माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे -गुलटेकडी येथील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख यांच्या आत्महत्या...

खडकवासला धरण समूहात सकाळी 6 वाजेपर्यंत 21.02 टीएमसी म्हणजे 72.12% पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.28 टीएमसीने कमी पुणे, दि. 23...