शांतता क्षेत्रात कायद्याची कडक अंमलबजावणी :पोलीस आयुक्तांचे आश्वासन.

Date:

उत्सवांना नव्हे तर गोंगाटाला विरोध असल्याने कायद्याचे पालन करणाऱ्या मंडळांचे स्वागतच! : लाऊडस्पिकरविरोधी पुणेकर मंचाची भूमिका

ध्वनी प्रदूषण संदर्भात प्रभागानुसार जबाबदार अधिकार्यांची यादी पोलिसांच्या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. ध्वनी प्रदूषण नियम वर्षभर सर्वच सणांना , मिरवणुकीस लागू करणार : पोलीस आयुक्तांचे आश्वासन

पुणे:

10 सप्टेंबर 2026 रोजी डॉ कल्याणी मांडके यांच्या अर्जावर राष्ट्रीय हरित लवादाने शांतता क्षेत्रामध्ये कुठलाही स्पीकर,वाद्य,फटाके आदींसाठी पूर्ण बंदीचे आदेश दिले असून या बाबतीत कारवाईची सर्व माहिती कोर्टास सादर करावयाची आहे. पुण्यामध्ये 121 शांतता क्षेत्रे घोषित झालेली आहेत. या संदर्भामध्ये आज लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या प्रतिनिधींनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली व याविषयी निवेदन देत सविस्तर चर्चा केली.

या चर्चेदरम्यान या सायलेंट झोन म्हणजे मुख्यत्वे हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेज आणि कोर्ट आदी ठिकाणी 100 मीटर अंतरावर मार्किंग सायनेज करण्यात यावे व त्या क्षेत्रातील कमाल ध्वनी मर्यादा माहिती प्रदर्शित करण्यात यावी अशी पुणेकर मंचाचे मुकुंद किर्दत यांनी मागणी केली. तसेच 112 नंबर वर नागरिक तक्रारी करतात परंतु त्याचे बऱ्याचदा तात्पुरते निराकरण होते आणि पोलिसांनी स्वतःहून ध्वनी प्रदूषण नियम भंगाच्या नोंदी कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या. त्याबाबत पोलीस आयुक्तांची भूमिका सकारात्मक होती व यासंदर्भात सर्व संबंधित तक्रारीस जबाबदार अधिकाऱ्यांची यादी, फोन नंबरसह वेबसाईटवर टाकली जाईल असे सांगण्यात आले.

या ध्वनीपातळी नियमांची अंमलबजावणी गणेश उत्सव तसेच मोहरम, ईद, डॉ आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती व सर्वच जाती,धर्म,राजकीय पक्ष, महापुरुष आदींच्या मिरवणुकीमध्ये समारंभामध्ये केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.

पोलिसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी मिरवणुकी दरम्यान ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. तसेच सोलापूर, नवी मुंबई, अहिल्यानगर, संभाजीनगर, भंडारा, नागपूर आदी शहरांप्रमाणे सर्वच शहरांना समान नियम असावेत आणि पुणेकरांना आरोग्यास घातक आवाजापासून त्रासमुक्त करावे असे आवाहन यावेळेस लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंचातर्फे करण्यात आले.

पुढील काळात ढोल सरावाची ठिकाणे , मंडप आकार, फटाके, वाद्ये याबाबत नियमावली तयार करण्यात यावी हि मागणी केली. नागरिकांना होत असलेल्या मानसिक शारीरिक हानी ची जबाबदारी चे उत्तरदायित्व निश्चित करावे अशीही मागणी करण्यात आली.

या सर्वच बाबींविषयी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भूमिका सकारात्मक होती. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांची भेट देऊन एनजीटीच्या आदेशाप्रमाणे रियल टाईम डेटा व रोजच्या ध्वनी पातळी नोंदी या वेबसाईटवर 24 तासाच्या आत टाकण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. हा आदेश पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, त्या अनुषंगाने पुण्यात 200 ठिकाणी एजेन्सी मार्फत या ध्वनी पातळीच्या नोंदी करण्यात येणार असून त्याबाबत रोजच्या रोज प्रसिद्धी देण्याच्या शक्यतेचा विचार करता येईल असे त्यांनी सांगितले.

आजच्या या भेटीत लाऊडस्पिकरविरोधी पुणेकर मंचाचे मुकुंद किर्दत , डॉ राहुल सावंत, चिंतामणी कांगो, समीर बर्डे, डॉ सिमी आठवले, अशोक मेहंदळे, आशिष गुंजाळ, उमेश खंदारे आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

भूसंपादनाची ६० ते ७० टक्के प्रक्रिया १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...

पीक कर्ज वाटपाला गती देऊन उद्दिष्टपूर्ती करा – अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

पुणे, दि. १७ : जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उर्वरित...

IAA Transportation 2026 मध्ये Tata AutoCompची ताकद; EVपासून थर्मल मॅनेजमेंटपर्यंत मोबिलिटी सोल्युशन्सचे प्रदर्शन

जर्मनीतील हॅनोवर येथे जागतिक व्यासपीठावर 22 बिझनेस युनिट्सच्या क्षमता...