मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव, कॅलिपर व सपोर्टिव्ह स्टिक वाटप उपक्रम

Date:

पुणे :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त समाजातील दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक तसेच चालण्यास अडचण असलेल्या रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने विशेष सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते 560 दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कॅलिपर तसेच ज्येष्ठ नागरिक व पायांच्या आजारामुळे चालण्यास अडचण असलेल्या रुग्णांना सपोर्टिव्ह स्टिक (काठ्या) यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

या प्रसंगी महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गरजू, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम, स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे, हीच या उपक्रमामागील भावना आहे.”

या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, ज्येष्ठ नागरिकांनाही सुरक्षितपणे चालण्यासाठी आवश्यक आधार उपलब्ध होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या सेवेसाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध मान्यवर, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वैद्यकीय तज्ज्ञ, नागरिक तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आणि जनसेवेचा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ठेकेदार आत्महत्या प्रकरण:माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे -गुलटेकडी येथील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख यांच्या आत्महत्या...

खडकवासला धरण समूहात सकाळी 6 वाजेपर्यंत 21.02 टीएमसी म्हणजे 72.12% पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.28 टीएमसीने कमी पुणे, दि. 23...