ठेकेदार आत्महत्या प्रकरण:माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

Date:

पुणे -गुलटेकडी येथील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या बाळा शेडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला. धंगेकर यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

खलील रज्जूलाल शेख (वय ६५) यांनी गुलटेकडी येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती आणि काही व्हिडिओ देखील तयार केले होते, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. आर्थिक व्यवहार, व्यावसायिक वाद, मानसिक त्रास आणि धमक्यांच्या आरोपांवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात नाव आल्यानंतर धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने पुणे सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात ॲड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत हा अर्ज सादर करण्यात आला. सरकार पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी या अर्जावर निर्णय दिला.

धंगेकर यांच्या वतीने युक्तिवाद करताना, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांचे नाव नसल्याचा दावा करण्यात आला. शेख यांच्या आत्महत्येशी धंगेकर यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नसून, राजकीय द्वेषातून त्यांना या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, तपासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुसरीकडे, बाळा शेडगे यांचा अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून एसआयआर मोहिमेला गती

बीएलओंसमवेत घराघरांत मतदारांशी संवाद नागरिकांकडून एसआयआर गणना फॉर्म स्वीकारले पुणे :...