ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून एसआयआर मोहिमेला गती

Date:

बीएलओंसमवेत घराघरांत मतदारांशी संवाद

नागरिकांकडून एसआयआर गणना फॉर्म स्वीकारले

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी SIR मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासह कोथरुड मधील घराघरांत भेटी देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून भरलेले एसआयआर गणना फॉर्म स्वीकारून मोहिमेबाबत जनजागृतीही करण्यात आली.

या भेटीदरम्यान ना. पाटील यांनी मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत; प्रत्येक मतदाराची माहिती अचूक आणि अद्ययावत राहणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष म्हणजे यावेळी चंद्रकांतदादांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत; ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नव्हते, अशा सर्वांना आवश्यक मार्गदर्शन करुन फॅार्म भरुन घेतले. तसेच, भरलेले फॉर्म तत्काळ स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया देखील यावेळी पार पडली.

“मतदार यादीतील अचूकता ही सशक्त लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मतदाराचे नाव यादीत समाविष्ट असावे, कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडूनही या मोहिमेला ८ ॲागस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन आपला SIR फॉर्म वेळेत भरून बीएलओंकडे जमा करावा,” असे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुमीत राघवनचा संताप; म्हणाला, ‘लोकशाही आहे की नाही?’

मुंबई - सध्या देशभरात दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाची चर्चा...

ठेकेदार आत्महत्या प्रकरण:माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे -गुलटेकडी येथील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख यांच्या आत्महत्या...